शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘ताकद राहिली नाही’, दैवी शक्तीचा दावा करणारा अशोक खरात झाला गलितगात्र, फोटो पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 22:39 IST

Ashok Kharat Case: दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा अशोक खरात हा गेल्या तीन चार दिवसांपासून  पोलिसांकडून सुरू असलेल्या पाहुणचारामुळे चांगलाच कोलमडला असून, गतिलगात्र झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे समोर आले आहे आहे. 

अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटकेची कारवाई केलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. तसेच पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, स्वत:ला अवतार म्हणवणारा, आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा अशोक खरात हा गेल्या तीन चार दिवसांपासून  पोलिसांकडून सुरू असलेल्या पाहुणचारामुळे चांगलाच कोलमडला असून, गतिलगात्र झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे समोर आले आहे आहे. 

भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला पोलीस त्यांच्यासोबत नेत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांसमोर मोठ्या तोऱ्यात वावरणारा आणि महिलांचं शोषण करणारा अशोक खरात हा कमालीचा गलितगात्र आणि अशक्त झालेला दिसत आहे. तसेच तिथे उपस्थित असलेले त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या घोषणा म्हणवून घेताना दिसत आहेत. यावेळी आता ताकद नाही राहिली, असे खरात म्हणत असल्याचे या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.

दरम्यान, अनेक महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरातची नाशिकमधील पोलीस हेडक्वाटर्समधील हिमांशू पोलीस क्लब येथे गेल्या तीन दिवसांपासून चौकशी केली जात होती. दरम्यान, आता पोलिसांनी अशोक खरात याच्या चौकशीचं ठिकाण बदललं असून, त्याला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी केली जात आहे.

अशोक खरात याच्या कारकिर्दीची सुरुवात ही मर्चेंट नेव्हीमधून झाली होती. जगभर फिरल्यामुळे त्याने इंग्रजीसह अनेक परदेशी भाषा आत्मसात केल्या. भारतात परतल्यानंतर त्याने दक्षिण भारतीय भाषांवरही प्रभुत्व मिळवले. याच काळात त्याने अंकशास्त्र या विषयाचा अभ्यास करून लोकांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू या अंकशास्त्राला त्याने भोंदूपणाची जोड दिली. माझ्या शरीरात प्रत्यक्ष महादेव येतात, असे सांगून त्याने लोकांच्या मनात भीती आणि श्रद्धा यांचे अजब मिश्रण तयार केले. ब्लॅक मॅजिकच्या अफवा पसरवून त्याने अनेकांना मानसिक गुलाम बनवले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Self-proclaimed divine power guru Ashok Kharat weakened after arrest.

Web Summary : Ashok Kharat, arrested for sexually exploiting women, appears frail in police custody. Claiming divine powers, he now seems broken after interrogation. Once powerful, Kharat is now weakened, his empire built on fear and false claims crumbling.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र