Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 22:32 IST2026-04-03T22:26:50+5:302026-04-03T22:32:36+5:30

Ashok Kharat Case : या खळबळजनक खुलाशानंतर आता समता आणि जयदंबा माता या दोन्ही पतसंस्था पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.

Ashok Kharat Case Bhondubaba Kharat's 'Mahapratap'! 100 bogus accounts opened in the names of devotees; 'Samata' and 'Jaydamba' credit unions on the radar | Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर

Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर

स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. खरातने केवळ भक्तांची फसवणूकच केली नाही, तर त्यांच्याच आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर करून चक्क पतसंस्थांमध्ये बोगस खात्यांचा डोंगर उभा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खळबळजनक खुलाशानंतर आता समता आणि जयदंबा माता या दोन्ही पतसंस्था पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.

'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने आपल्या अनेक भक्तांना विश्वासात घेऊन त्यांची आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा केली होती. या कागदपत्रांचा वापर करून त्याने 'समता पतसंस्थेत' तब्बल १०० हून अधिक बोगस खाती उघडली. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व खात्यांवर वारसदार म्हणून स्वतः अशोक खरातचेच नाव लावण्यात आले आहे. हा सर्व प्रकार काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी केल्याचा संशय पोलिसांना आहे.

अशोक खरातच्या या मायाजालात केवळ सामान्य भक्तच नाही, तर काही बडी नावेही अडकल्याचे दिसत आहे. राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्या नावे देखील समता पतसंस्थेत खाती उघडण्यात आली आहेत. इतकेच नाही तर नामकरण आवारे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची मिळून तब्बल सहा खाती याच पतसंस्थेत असल्याची माहिती उघड झाली आहे.

या प्रकरणी नामकरण आवारे यांची पोलिसांनी गेल्या नऊ तासांपासून कसून चौकशी सुरू केली आहे. आवारे यांच्या खात्यांतून नेमके कसले व्यवहार झाले आणि खरातशी त्यांचे आर्थिक संबंध काय होते, याचा छडा पोलीस लावत आहेत. या चौकशीतून आणखी अनेक भक्तांची नावे आणि बोगस खाती समोर येण्याची शक्यता असल्याने पोलीस तपासाला वेग आला आहे.

पतसंस्थांच्या अडचणीत वाढ होणार?

बोगस खाती उघडताना पतसंस्थांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का? केवायसी पडताळणीविना ही खाती कशी उघडली गेली? या प्रश्नांनंतर समता पतसंस्था आणि जयदंबा माता पतसंस्था यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title : फर्जी गुरु अशोक खरात ने भक्तों के दस्तावेजों से खोले 100 फर्जी खाते

Web Summary : फर्जी गुरु अशोक खरात पर आरोप है कि उन्होंने भक्तों के पहचान पत्रों का उपयोग कर क्रेडिट सोसाइटियों में 100 से अधिक फर्जी खाते खोले। केवायसी उल्लंघन और संभावित मनी लॉन्ड्रिंग के लिए समता और जयदंबा समितियों की जांच की जा रही है। पुलिस शामिल व्यक्तियों से पूछताछ कर रही है।

Web Title : Fake Guru Ashok Kharat Opened 100 Bogus Accounts Using Devotees' Documents

Web Summary : Ashok Kharat, a fake guru, allegedly defrauded devotees by opening 100+ bogus accounts in credit societies using their IDs. Samata & Jaydamba societies are under investigation for KYC violations and potential money laundering. Police are questioning involved individuals.