शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat Case: "अशोक खरातचा एन्काऊंटर होण्याची शक्यता" तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा, तारीखही सांगितली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 21:53 IST

Trupti Desai On Ashok Kharat Case: अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरला आहे. एका महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे या नराधमाचे खरे रूप जगासमोर आले आहे.

अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या पापाचा घडा भरला आहे. एका पीडित महिलेने धाडस दाखवत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले असून, एका पेनड्राइव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे.

तृप्ती देसाई यांनी खरातचे अनेक बड्या मंत्र्यांशी आणि राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या की, "खरातकडे असलेल्या माहितीमुळे अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी खरातचा काटा काढला जाऊ शकतो. अशोक खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४ तारखेला त्याला न्यायालयात हजर करताना त्याचे एन्काउंटर घडवून आणले जाऊ शकते, असा दावा देसाई यांनी केला आहे. राजकीय नेत्यांची नावे समोर येऊ नयेत यासाठी हे संपूर्ण प्रकरण कायमचे बंद करण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत खरातच्या ताब्यातून जो पेनड्राइव्ह जप्त केला आहे, त्यातील व्हिडिओ पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. अनेक महिलांचे शोषण करून त्यांचे चित्रीकरण केल्याचा संशय बळावला आहे. या कृत्यामुळे आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, खरातच्या संपर्कात कोणकोणते व्हिआयपी लोक होते, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातTrupti Desaiतृप्ती देसाईNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र