भोंदू अशोक खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू एसआयटीने तपासात उघड केले असून फक्त भक्तांकडूनच तो रोखीने व्यवहार करीत नव्हता तर कोट्यवधीचे व्यवहारही त्याने कॅश नेटवर्कद्वारे उभे केल्याचं उघड झालं आहे. पुण्यात मुलीच्या नावे खरातने खरेदी केलेला एक कोटी तीस लाख रुपयांचा फ्लॅट रोख स्वरुपात घेतला होता, ही बाब तपासात उघड झाली आहे.
एसआयटी आपल्या तपासात भोंदू अशोक खरातच्या मोबाईलमधील कोड नेटवर्कचे जाळं तपासत असताना त्याच्या कॅश नेटवर्कच्या अनेक बाबी पडताळून पाहण्यात आल्या. अशा रोखीने व्यवहाराच्या अनेक बाबी एसआयटीच्या तपासात उघड झाल्या असून, खरात हा व्यवहारात अतिशय चलाख होता. कुठेही अडकणार नाही, याची तो खबरदारी घेत होता. खरातने पुण्याच्या मॉडर्न कॉलनी या उच्चभ्रू वसाहती मुलीच्या नावाने फ्लॅट घेतला आहे, त्यासाठी खरातने एक कोटी ३० लाख रुपये बिल्डरला रोखीने दिल्याचे उघड झाले.
'या' सोसायटीत खरेदी केला होता फ्लॅट
खरात याने मागच्या चार वर्षात जवळपास ७० कोटींच्या प्रॉपर्टी अहिल्यानगर, नाशिक, पुणे या भागात घेतल्या आहेत. त्यासाठीदेखील खरातने १० टक्के पेमेंट रोखीने केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले असून, त्याने काही प्रॉपर्टीमाध्ये आपले स्वत:चे नाव न घेता पार्टनर म्हणून दुसऱ्याचेच नाव घेतले आहे.खरात भक्तांकडून जे लाखो रुपये उकळत असे, तेदेखील तो रोख घेत होता. यासाठी एसआयटीने मागच्या तीन दिवसात त्याचे बँक अकाउंट तिसऱ्यांदा तपासले. त्यात ही बाब उघड झाली आहे.
गुप्तधनाचा मोह, प्रगतीची आस; संकटातून बाहेर पडण्यासाठी महिला भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात
भोंदू खरात याचे दोन मोबाइल एसआयटीने जप्त केले आहेत, त्यातदेखील खरातच्या कॅश नेटवर्कचे जाळे उघड झाले असून, रोखीने पैसे स्वीकारण्यासाठी त्याने एक अगदी जवळच्या नातेवाईकांमधील स्वतंत्र टीम तयार केली होती. खासकरून त्याने यासाठी पत्नीच्या माहेरच्यांना हाताशी धरल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. तसेच अनेक व्यवहारात त्याची पत्नीदेखील रोखीने पैसे स्वीकारत होती.
भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात
खरातने नाशिकमधील बंगला तसेच ओकस प्रॉपर्टी ऑफिसमध्ये दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. यासाठी लाखो रुपये खरातने खर्च केले. हा व्यवहारदेखील खरात याने रोखीने केला होता. डिझायनर, बांधकाम कारागीर, फर्निचर कारागीर यांना खरातने जवळपास २५ लाख रुपये रोखीने दिल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाल्याचे सांगण्यात येते.
Web Summary : Self-proclaimed guru Ashok Kharat's cash network is under investigation. He allegedly bought a flat for his daughter in Pune for ₹1.3 crore in cash. He owns properties worth ₹70 crore and uses cash for transactions. His relatives and wife are also involved in handling cash.
Web Summary : फर्जी गुरु अशोक खरात के नकद नेटवर्क की जांच चल रही है। कथित तौर पर उन्होंने पुणे में अपनी बेटी के लिए 1.3 करोड़ रुपये में एक फ्लैट खरीदा। उनके पास 70 करोड़ रुपये की संपत्ति है और वह लेनदेन के लिए नकदी का उपयोग करते हैं। उनके रिश्तेदार और पत्नी भी नकदी संभालने में शामिल हैं।