शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:49 IST

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडीचा “खुलासा” करणारी मुलाखत दिलीजनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला “दिलासा” देणारी अपेक्षित होती

मुंबई -  आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजपा नेते आशीष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ही तर अनैसर्गिक आघाडीचा खुलासा करणारी मुलाखत असल्याचा टोला आशीष शेलार यांनी लगावला आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला भाजपा नेते आशीष शेलार यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. ''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडीचा “खुलासा” करणारी मुलाखत दिली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला “दिलासा” देणारी अपेक्षित होती, अशा आशयाचे ट्विट शेलार यांनी केले आहे. 

दरम्यान, सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासह अनेक बाबींवपर गौप्यस्फोट केले  आहेत. या मुलाखतीमध्ये सध्या  महाराष्ट्राचं राजकारण घडलंय किंवा बिघडलंय. काहींचं बिघडलं, काहींचं घडलं. आपण समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी घडवणारा आहे, बिघडवणारा नाही. ज्यांचं कुणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडवून घेतलंय. मी नाही बिघडवलं! बरं, जसं ठरलं होतं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो. मी नेहमीचा जसा आहे आणि पुढेही राहणार आहे, तसाच बसलो असतो.'' 

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या भाजपावर हल्लाबोल केला आहे. 'आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत आणि राहणार. त्यात तडजोड नाही' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच 'हिंदुत्वाच्या मुद्दयावर आम्ही एकत्र आलोे. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही' अशा शब्दांत भाजपावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना