Asha Bhosle: प्रवृत्ती निवृत्तीचा सुरेल संगम..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:55 IST2026-04-13T10:55:19+5:302026-04-13T10:55:55+5:30

Asha Bhosle: अगदी लहानपणीचं आठवायचं झालं, तर सगळ्यांत अगोदर मला आशाबाईंची नाट्यगीतं आठवतात. ‘शूरा मी वंदिले...’, ‘चंद्रिका ही जणू...’, ‘विलोपले मधु मिलनात...’ ही गाणी आठवतात व भावतात देखील. खरं म्हणजे, त्यावेळी माझं वय लहान... संगीताचा अभ्यास नव्हता... पण का कुणास ठाऊक ही गाणी आठवतात.

Asha Bhosle: A harmonious blend of instinct and retirement..! | Asha Bhosle: प्रवृत्ती निवृत्तीचा सुरेल संगम..!

Asha Bhosle: प्रवृत्ती निवृत्तीचा सुरेल संगम..!

- मोहन भागवत
(सरसंघचालक)
अगदी लहानपणीचं आठवायचं झालं, तर सगळ्यांत अगोदर मला आशाबाईंची नाट्यगीतं आठवतात. ‘शूरा मी वंदिले...’, ‘चंद्रिका ही जणू...’, ‘विलोपले मधु मिलनात...’ ही गाणी आठवतात व भावतात देखील. खरं म्हणजे, त्यावेळी माझं वय लहान... संगीताचा अभ्यास नव्हता... पण का कुणास ठाऊक ही गाणी आठवतात. त्यानंतर खूप गाणी ऐकली.
एखाद्या दीड तासाच्या भाषणाचा आशय, तीन मिनिटांच्या गाण्यात अगदी नेमक्या गायकीमुळे, गीतातील शब्द, अर्थ आणि भावासकट समोर उभा ठाकतो. आशाबाईनी अशी अनेक गाणी गायलेली आहेत. त्यांच्या कार्यक्रमात गाण्याच्या प्रस्तावनेतून जेव्हा त्या पार्श्वभूमी विषद करायच्या, तेव्हा त्यांची सावरकरभक्ती आणि देशप्रेम सहज कळायचे. ‘उष:काल होता होता...’ हे गाणं ऐकताना आणि त्यामागचे आशाबाईंचे विचार ऐकताना आपण आजही भारावून जातो. ही बाब समर्थपणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याची किमया आशाबाईंना सध्या झाली हाेती.

आशाबाईंचं प्रवृत्ती अंगाने जाणारं, कधी खळखळाट करणारं, कधी शांत-संयमी, तर कधी विविध भावनांचा परिपोष करणारं गाणं, माणसांच्या चित्तवृत्ती उल्हसित करत त्यांना खेळवत खेळवत, बकवून विरामाकडे नेतं. उदाहरणार्थ, ‘जिवलगा...!’ गंभीरता तीच... सागराची.... पण गाण्याचे स्वर, व्याकुळता, आतून आलेला सच्चा आवाज, या मार्गाने प्रवृत्ती अंगाने जाऊन निवृत्तीचा आनंद देणारं गाणं होतं, आशाबाईंचं!!     ('सरस्वामिनी आशा' पुस्तकातून साभार)

Web Title : आशा भोसले: प्रवृत्ति और निवृत्ति का सुरीला संगम!

Web Summary : मोहन भागवत आशा भोसले के प्रभावशाली गीतों को याद करते हैं, जो गहरे अर्थ और देशभक्ति व्यक्त करने की उनकी क्षमता को उजागर करते हैं। उनका संगीत, चंचल से लेकर गहरा तक, दिलों को छूता है, सांसारिक जुड़ाव और आध्यात्मिक शांति का एक अनूठा मिश्रण पेश करता है, जैसा कि 'जिवलगा' जैसे गीतों में है।

Web Title : Asha Bhosle: A Melodious Blend of Engagement and Detachment!

Web Summary : Mohan Bhagwat recalls Asha Bhosle's impactful songs, highlighting her ability to convey deep meaning and patriotism. Her music, ranging from playful to profound, touches hearts, offering a unique blend of worldly engagement and spiritual peace, exemplified in songs like 'Jivalaga'.