शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर आता शक्तिपीठ महामार्ग रेटला जाण्याची चिन्हे, नव्याने आंदोलनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:14 IST

सांगली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर जुन्या प्रलंबित योजनांना चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये ...

सांगली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर जुन्या प्रलंबित योजनांना चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाचा विषय प्राधान्याने अजेंड्यावर आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नांदेड येथील प्रचारसभेत शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा उचलून धरल्याने राज्य शासनही तो नव्याने मार्गी लावण्याची शक्यता आहे.शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा दावा मोदी यांनी जाहीर सभेत केला. स्वत: पंतप्रधानच महामार्गाची पाठराखण करीत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांवर मीठ चोळले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट होण्यात शक्तिपीठचा मुद्दाही महत्त्वाचा ठरल्याची चर्चा होती. त्यामुळे विधानसभेला ताकही फुंकून पिण्याचा प्रयत्न युतीच्या नेत्यांनी केला. महामार्ग रद्द होणारच यावर भर दिला. आता निवडून आल्यानंतर त्यांना दिल्या शब्दाला जागावे लागणार आहे. अधिसूचनेनुसार सांगली, कोल्हापुरातील महामार्ग रद्द झाला, तरी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत तो होणार असल्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांना त्याविरोधात नव्याने लढा उभारावा लागणार आहे.नव्या आमदारांनी शब्द पाळावाविधानसभा निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यान कोल्हापुरात आजी-माजी आमदारांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. यातील काहीजण निवडूनही आले आहेत. आता त्यांनी महामार्ग रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस अगोदर घाईगडबडीने सांगली, कोल्हापुरातील महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना काढली होती. पण, पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा पुन्हा उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSangliसांगलीhighwayमहामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारFarmerशेतकरी