Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 07:16 PM2019-08-24T19:16:49+5:302019-08-24T19:17:50+5:30

त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार मी दिल्लीतच थांबलो आणि नंतर...

Arun Jaitley Death : according to jaitley and given minister post :prakash javdekar | Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर 

Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर 

googlenewsNext

पुणे : सन २०१४ साली मला राज्यसभेचे तिकिट मिळाले नाही म्हणून, मी पुण्याकडे प्रस्थानाच्या तयारीत होतो़. त्यावेळी अरुण जेटली यांनी मला बोलावून, ओ मराठा वीर, तुम्ही एकदम नेहमीसारखे सामान आवरून निघून जाऊ नका ! , निवडणूक झाल्यावर जूनपर्यंत इथेच थांबा़, मे अखेरपर्यंत आपण काय करायचे ते ठरवू़ असे सांगून मला पुण्याला जाण्यापासून रोखले़. त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार मी दिल्लीतच थांबलो आणि नंतर मला नरेंद्र मोदींनी मंत्री पदाची शपथ घ्यायला सांगितले, अशी जेटलींविषयीची हृदयस्पर्शी आठवण केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी '' लोकमत '' शी बोलताना उलगडली. 
    बहुमुखी प्रतिमा, ओजेस्वी वक्तृत्व, मोजक्या शब्दांमध्ये नेमका संदेश देण्याची कसब आणि अद्भूत स्मरणशक्ती हे अरूण जेटली यांचे विशेष होते़ त्यांच्याशी माझे नेहमीच व्यक्तिगत संबंध असायचे, त्यांचे निधन हा मला मोठा धक्का असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले़.  त्यामुळे आपोआपच मध्यप्रदेशातून मी खासदार झालो़. 
     मी दिल्लीमध्ये पक्षाचा प्रवक्ता म्हणून गेल्यानंतर त्यांच्या नऊ ,अशोका रोड या बंगल्यामध्येच राहत असत़. यावेळी आम्ही सर्व काम करणारे लोक बरोबरच असायचो़.एखाद्या विषयाबाबत जेटलींना केव्हाही माहिती विचारली तर ते लगेच त्या विषयावर दोन ओळीत योग्य मार्गदर्शन करायचे़ राज्य सभेतील त्यांची भाषणे हा एक अनमोल ठेवा आहे़. 
    जीएसटी कौन्सिलमध्ये सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांना सतत बरोबर घेऊन एकमताने कायद्याचा शब्द न शब्द त्यांनी तयार केला़. नियम तयार करताना, दर ठरविताना तसेच दर महिन्यामध्ये काही सवलती द्यायच्या होत्या. त्याबाबत निर्णय घेतानाही त्यांनी सर्वांना बरोबरच घेऊनच या विषयी एकमताने निर्णय घडवून आणला़.  जीएसटीला काही पक्ष गब्बरसिंग टॅक्स म्हणोत़ पण त्यांचे समर्थन करताना वित्तमंत्री म्हणून अरूण जेटलींनी नेहमीच पाठिंबा दिला़. जेटली यांच्याकडे आम्ही एक मोठे नेतृत्व म्हणूनच पाहिले़. त्यांनी अनेक निर्णयांत नरेंद्र मोदींजींची सतत साथ केली़. आज आमच्यापेक्षा एक वर्षांने लहान असा प्रतिभावंत नेता गेल्याचे दु:ख निश्चित मोठे आहे़. 

Web Title: Arun Jaitley Death : according to jaitley and given minister post :prakash javdekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.