शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 20:32 IST

वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकाचे विविध जातींसाठी प्रसिध्द.

ठळक मुद्दे मंगळवारी (दि.३१) पक्षी गणना करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य

नाशिक : गुलाबी थंडीची चाहूल लागताच देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने राज्याचे ‘भरतपूर’ म्हणून नावलौकिक मिळविणारे नांदूरमधमेश्वर (चापडगाव) पक्षी अभयारण्य गजबजण्यास सुरूवात होते. या पाश्वर्भूमीवर वनखात्याच्या वन्यजीव विभागाकडून मंगळवारी (दि.३१) पक्षी गणना करण्यात आली. विविध जातीचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरिक्षकांकडून नोंदविण्यात आली. एकूणच ‘भरतपूर’च्या हिवाळी संमेलनाला सुरूवात झाली असून अभयारण्याचा परिसरात विविध पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागला आहे.

वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकाचे विविध जातींसाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आगमन झालेले पहावयास मिळते. हिवाळ्याचा हा हंगाम पक्षीप्रेमींसाठी पर्वणीकाळ ठरतो.

थंडीची सुरूवात होताच अभयारण्य पक्ष्यांनी गजबजू लागले आहेत. मंगळवारी सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, परिमंडळ अधिकारी पी.के.आगळे, प्रा. आर.बी. पाटील यांच्यासह निफाडचे जेष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर, वनविभागाने नियुक्त केलेले गाईड अमोल दराडे, गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे आदिंनी अभयारण्य परिसरातील विविध निरिक्षण मनोर्‍यावर दिवसभर ठिय्या देऊन पक्ष्यांचे निरिक्षण करत अधिकृत आकडा नोंदविला. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षीनिरिक्षकांची पावले ‘भरतपूर’कडे वळण्यास सुरूवात झाली आहे. वीकेण्डला पर्यटकांसह पक्षीप्रेमींची येथे गर्दी लागली आहे.

टॅग्स :DamधरणNashikनाशिक