Suraj Chavan ( Marathi News ) : लातूरमध्ये काल‘छावा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले. यानंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
"सुरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाइन पत्ते खेळतात आणि लोकांना राग येऊन त्यांनी निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत ही गुंड प्रवृत्तीची लोकं मारणार?, असा सवाल दमानिया यांनी केला.
"सूरज चव्हाण ह्या माणसाची इतकी मजाल की, ह्या घटनेनंतर ते एका मराठी चॅनेलशी बोलताना म्हणतात की त्या लोकांनी ‘असंविधानिक’ भाषा वापरली? म्हणून तुम्ही मारहाण करणार? मग मारहाण करणे हे कृत्य संविधानिक आहे ?", असंही दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
"तुम्हाला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ? तातडीने त्या सूरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करा", अशी मागणी दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहेत. तसेच "मुख्यमंत्री फडणवीस आता तरी थांबवा ही गुंडगिरी', असंही या पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत हाेते. ‘छावा’चे कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत हाेते. काहींनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य मार्गावर लावलेले बॅनर फाडले.
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान आपली भूमिका मांडताना ॲड. घाडगे-पाटील यांनी पत्ते उधळत मागण्या मांडल्या आणि निवेदन दिले. त्यानंतर ते विश्रामगृहात थांबलेले असताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ‘छावा’चे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी राष्ट्रवादीच्या काहीजणांनी ॲड. घाडगे पाटील व तेथील एकदाेघांना मारहाण केली. पाेलिस येईपर्यंत बराच गदाराेळ सुरू हाेता. स्थानिकचे कार्यकर्ते हस्तक्षेप करून भांडणे नकाे, असे आवाहन करीत हाेते. परंतु, जबर मारहाणीमुळे वातावरण तापले. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा औसा राेडवर ‘छावा’च्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीविराेधात जाेरदार घाेषणाबाजी सुरू केली. त्यावेळी तत्परतेने पाेलिस दाखल झाले. त्यांनी शांततेचे आवाहन केले. काही वेळानंतर जमाव पांगला. पाेलिसांनी रात्री उशिरापर्यंत बंदाेबस्त वाढविला हाेता.