लाच मागणाऱ्यास अटक

By Admin | Published: May 14, 2016 02:59 AM2016-05-14T02:59:58+5:302016-05-14T02:59:58+5:30

जमिनीचे एक प्रकरण मंजूर करवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात गजानन लक्ष्मण पाटील या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयाजवळ अटक केली

The arrest of the bribe | लाच मागणाऱ्यास अटक

लाच मागणाऱ्यास अटक

googlenewsNext

मुंबई : जमिनीचे एक प्रकरण मंजूर करवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात गजानन लक्ष्मण पाटील या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयाजवळ अटक केली असून आरोपी मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे आमदार आहेत.
तक्रारकर्त्या व्यक्तीची एक सामाजिक संस्था असून या संस्थेच्या एका मोठ्या जमिनीचे प्रकरण मंजुरीसाठी मंत्रालयात प्रलंबित होते. या प्रलंबित प्रकरणाचे काय झाले, याची माहिती घेण्यासाठी संबंधित व्यक्ती मंत्रालयातील महसूल विभागात गेली असता त्या ठिकाणी गजानन लक्ष्मण पाटील याने त्यांना गाठले. ‘तुमचे काम करुन देतो, पण आधी १५ कोटी रुपये आणि काम झाल्यानंतर १५ कोटी रुपये असे ३० कोटी रुपये द्यावे लागतील. मी एका अधिकाऱ्यामार्फत हे काम करवून देईन, असे सांगत पाटील याने लाच मागितली. याबाबत फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. एसीबीने तक्रारीची शाहनिशा केली असता, लाच मागण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्या नंतर एसीबीने पाटील याला शुक्रवारी सायंकाळी अटक केली. सूत्रांनी सांगितले की, महसूल विभागातील कोणत्या अधिकाऱ्याच्या नावे लाच मागितली त्या अधिकाऱ्याचे नाव आरोपी पाटील याने एसीबीला सांगितले आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्याची देखील चौकशी एसीबीने सुरू केली आहे. (विशेष प्रतिनिधी)या प्रकरणातील आरोपी गजानन पाटील हा मंत्रालयात नेहमीच वावरतो. विशेषत: महसूल विभागात त्याची जास्त उठबस असते. कामे घेऊन आलेल्यांना गाठणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे उद्योग तो करत असल्याचे समजते....तर कठोर कारवाई करा - खडसे
मुंबईतील अथवा जळगाव येथील माझ्या कार्यालयात गजानन पाटील अथवा गजमल पाटील या नावाची व्यक्ती अधिकृतपणे अथवा खासगीरीत्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. माझ्या नावाचा कोणी गैरवापर करीत असेल व ती व्यक्ती दोषी असेल तर त्यांच्याविरु द्ध कठोर कारवाई करावी, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
गजानन पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असून ते अधून-मधून जळगाव
जिल्ह्यातील गरजू रुग्णांनान वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे आणत असतात. ते तालुक्यातील
रहिवासी असल्यामुळे परिचित आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: The arrest of the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.