दुष्काळात जुलमी वसुली न केल्याने थकबाकी वाढली; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:31 AM2020-11-20T07:31:47+5:302020-11-20T07:32:13+5:30

भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.

arrears increased due to non-recovery of tyrants during the drought; BJP's counterattack | दुष्काळात जुलमी वसुली न केल्याने थकबाकी वाढली; भाजपचा पलटवार

दुष्काळात जुलमी वसुली न केल्याने थकबाकी वाढली; भाजपचा पलटवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आमच्या सरकारच्या काळात चार वर्षे दुष्काळ होता, शेतकरी त्रस्त होते अशावेळी त्यांच्याकडून वीज बिलांची जुलमी वसुली करायला हवी होती काय, असा सवाल करीत भाजपने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आरोपांवर गुरुवारी पलटवार केला.


भाजपच्या कार्यकाळात वीज बिलांची थकबाकी ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देता येत नाही हा राऊत यांचा कांगावा दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रपरिषदेत केला.


पाठक म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा २१ हजार कोटी रुपयांची थकबाकी होती. आज ती ४७ हजार कोटी रुपये आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी बिले न भरल्याने आलेल्या ५ हजार कोटींच्या थकबाकीचाही त्यात समावेश आहे. तसेच थकबाकीवर आकारल्या जाणाऱ्या १८ टक्के दंड व्याजाचाही त्यात समावेश आहे. आमच्या काळात दुष्काळ होता, कृषी पंपांवरील विजेचा वापर वाढला होता. आधी २१ दशलक्ष युनिट असलेला वापर ३२ लाख दशलक्ष युनिटवर गेला होता. त्यातच आमच्या सरकारने सहा लाख नवीन कृषी पंप वीज जोडण्या दिल्या, त्यानेही वीजवापर वाढला. आधीच्या सरकारमध्ये वीज बिल वसुली १०० रुपयांमागे २१ रुपये इतकी होती, ती ६५ रुपयांवर गेली.


एका ट्रान्सफॉर्मरवर २५ कृषी पंपांचे कनेक्शन असेल आणि त्यातील एका कनेक्शनची थकबाकी झाली तरी सर्व कनेक्शन कापावेत असे तुघलकी परिपत्रक आघाडी सरकारने काढलेले होते, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता. आमचे सरकार येताच ते परिपत्रक रद्द करण्यात आले. आमच्या काळात महावितरण नफ्यात होते, त्याचा ताळेबंद सर्वांच्यासमोर आहे. राऊत यांनी उगाच दिशाभूल करू नये.  

 - विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते 

Web Title: arrears increased due to non-recovery of tyrants during the drought; BJP's counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.