शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अर्णब गोस्वामी म्हणाले, आपल्या जीवाला धोका; फिल्ममेकरनं लिहिलं - मुंबईत एकच राजा...!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 5:20 PM

गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्दे गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली.अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.पोलिसांच्या गाडीतून कारागृहात जाताना अर्णब यांनी, आपल्याला मारहाण करण्यात आली असून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.

मुंबई - गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. अर्णब यांना नुकतेच तळोजा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. पोलिसांच्या गाडीतून कारागृहात जाताना अर्णब यांनी, आपल्याला मारहाण करण्यात आली असून जीवाला धोका असल्याचे गाडीतूनच रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना  सांगितले.

अर्णब यांच्या या वक्तव्यावर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे. ते अनेक वेळा आपली मते ट्विटरवरून मांडत असतात. त्यांनी लिहिले आहे 'मुंबईचा राजा कोण? ते आहेत मुंबई पोलीस... आणि हेच एक सत्य आहे.' त्यांच्या या ट्विटवर यूझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी राम गोपाल वर्मांच्या ट्विटला विरोध केला, तर काहींनी त्यांच्या ट्विटचे समर्थनही केले आहे.

'ऑपरेशन अर्णब'साठी करण्यात आली होती मोठी तयारी, गृह विभागानं तयार केली 40 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम

आनंद नावाच्या एका यूझरने रिअॅक्ट होतांना लिहिले आहे, 'मला माहीत आहे.. पालघर लिंचिंगदरम्यान मी डरपोक पोलिसांना पाहिले आहेत.' 

सिद्धार्थ नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'म्हणून तू गोव्याला पळून गेलास का?' 

‘अर्णब गोस्वामींच्या घराच्या बालकनीत बसून गाणे ऐकण्याची इच्छा...’, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल

सुनील अत्री नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'भिकू म्हात्रेला थोड्या वेळासाठी भ्रम झाला होता.' तर सोनाजी पोहारे यांनी राम गोपाल वर्मा यांचे समर्थन करताना लिहिले आहे, 'फक्त मुंबई पोलीस १०० टक्के बरोबर आहेत.'

यापूर्वीही केली होती एक पोस्ट -बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यात, शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेने आपल्या पित्यासारखी हिंमत दाखवली आणि भूंकणाऱ्या मांजरीला न्यायालयाच्या पिंजऱ्यात कैद करण्याचे शौर्य दाखवले, अशा आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी अर्णब यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण त्यांची ही पोस्ट कोणासाठी आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.

अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस ​​​​​​​

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिसRam Gopal Varmaराम गोपाल वर्माbollywoodबॉलिवूडJournalistपत्रकार