लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 21:10 IST2025-12-13T21:10:17+5:302025-12-13T21:10:45+5:30
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्याची एकच संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार धक्का महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ही योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले. परिणामी विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला धडाकेबाज विजय मिळाला. ही योजना लागू झाल्यापासून विरोधक सातत्याने टीका करताना दिसले. या योजनेत काही त्रुटी, गडबड आढळल्यानंतर राज्य सरकारने पावले उचलत e-KYC करण्याचे बंधनकारक केले. परंतु, लाडकी बहीण योजनेत e-KYC करतानाही काही चुका झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या दुरुस्त करण्याची एकमेव संधी सरकारने दिली आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना ओटीपी मिळण्यात अडचणी येत होत्या. विशेषतः पती, वडील व मुलाच्या आधार क्रमांकावर मोबाइल नोंदणीकृत असल्याने ओटीपी उपलब्ध न होणाऱ्या अनेक महिलांचे ई-केवायसी रखडले. यासाठी सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आता प्रत्यक्ष कागदपत्रांच्या आधारे ई-केवायसी पूर्ण करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर आता झालेली चूक दुरुस्त करण्याची एकच संधी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्टवर दिली.
दरम्यान, या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असे आश्वासनही आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 13, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली… pic.twitter.com/nT4Pw6E2QP