शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओंमधील घोटाळ्यांना चाप

By admin | Updated: July 22, 2016 03:56 IST

वाहनांच्या टेस्टपर्यंतच्या प्रक्रियेत घेतल्या जाणाऱ्या चिरीमिरीला आळा घालणाऱ्या तरतुदी नव्या परिवहन धोरणात करण्यात आल्या आहेत.

यदु जोशी,

मुंबई- आरटीओ कार्यालयांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापासून तर वाहनांच्या टेस्टपर्यंतच्या प्रक्रियेत घेतल्या जाणाऱ्या चिरीमिरीला आळा घालणाऱ्या तरतुदी नव्या परिवहन धोरणात करण्यात आल्या आहेत. या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. नवीन धोरणानुसार राज्याच्या प्रत्येक आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग आणि वाहनांची फिटनेस टेस्ट संगणकीकृतच असेल. सध्याचा मानवी हस्तक्षेप संपविण्यात येणार आहे. सध्या केवळ नाशिक येथे वाहनांच्या फिटनेस टेस्ट संगणकीकृत होतात तर पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट या पद्धतीने होते. आता ती राज्यभर लागू केली जाईल.जड वाहनांचे (व्यावसायिक) ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण सध्या दर पाच वर्षांनी करावे लागते आणि त्यासाठी कोणतीही टेस्ट द्यावी लागत नाही. मात्र आता नवीन धोरणानुसार दर तीन वर्षांनी ड्रायव्हिंगची टेस्ट द्यावी लागेल आणि त्यात पास झालेल्यांच्या परवान्यांचेच नूतनीकरण करण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षा समितीची स्थापना करण्यात येणार असून, या समितीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार आहे. सध्या रस्ते सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत तरतूद केली जाते. जप्त केलेली वाहने आरटीओ कार्यालयांच्या परिसरात पडून राहतात आणि बरेचदा ती तिथेच खराबही होतात. आता अशा गाड्यांसाठी वेगळे शेड उभारण्यात येणार आहेत. केंद्र सरकारचा प्रस्तावित मोटर वाहन कायदा आणि राज्याचा सध्याचा कायदा यांचा तुलनात्मक अभ्यास करून नवीन धोरणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्याच्या कायद्यात रुग्णवाहिकांसाठीचे नियम असले तरी आज रुग्णवाहिकांच्या स्वरूपामध्ये अनेक बदल झालेले आहेत. ते कायद्यात नसल्याने बरेचदा रुग्णवाहिकाचालकांची अडवणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर, आधुनिक रुग्णवाहिकांचे निकष या धोरणात निश्चित करण्यात आले आहेत. >राज्यात प्रथमच आयटी महामंडळमाहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच माहिती तंत्रज्ञान महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव हे या महामंडळाचे अध्यक्ष असतील.