राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता, ५० कोटी रुपयांच्या निधीची करणार तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 00:58 IST2021-02-18T00:58:04+5:302021-02-18T00:58:32+5:30
Skills University : महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते.

राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता, ५० कोटी रुपयांच्या निधीची करणार तरतूद
मुंबई : राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते. विद्यापीठ प्रशासन आणि इमारतीच्या खर्चापोटी दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली. राज्यात ६ विभागीय ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलेन्स उभारण्याचेही प्रस्तावित आहे. ही ६ केंद्रे राज्य कौशल्य विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून काम पाहतील. आयटीआयचे रूपांतर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये करून ही विभागीय केंद्रे काम करू शकतील.
उन्नत मेट्रो प्रकल्पास मिळाला हिरवा कंदील
पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल.