शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मीरा भाईंदर महापालिकेचा आणखी एक टीडीआर गैरप्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 2:44 PM

पालिकेने स्थगिती दिली आणि पालिकेनेच टीडीआर वापरायला दिली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - महापालिका आरक्षणाच्या जागेच्या मोबदल्यात दिलेला टीडीआर वापरण्यास पालिकेने स्थगिती दिली असताना दुसरीकडे त्याच टीडीआर वापराच्या आधारे विकासकास बांधकाम परवानगी दिल्याचा मीरा भाईंदर महापालिकेचा आणखी एक घोटाळेबाज कारभार समोर आला आहे. 

मौजे नवघर येथील सर्वे क्र ४०९ / ६अ या पालिका आरक्षण क्रमांक २५८ व विकास आराखड्यातील रस्ता बाधित जागेसाठी अशोक गोयल यांनी सल्लागार अभियंता अनिस अँड असोसिएट मार्फत सादर करारनामा व प्रस्ताव नुसार सातबारा नोंदी फेरफार होऊन महापालिकेचे नाव लागले होते. त्या नंतर महापालिकेने २२१५ चौरस मीटर इतक्या क्षेत्राचा टीडीआर १७ मार्च २००७ रोजीच्या विकास हक्क प्रमाणपत्र क्र. १२५ नुसार दिला होता. परंतु जागेची मालकी अधिकार गोयल यांचे नसल्याने  उपविभागीय अधिकारी यांनी घेतलेल्या सुनावणी नंतर महापालिकेच्या नावे जमीन झाल्याचा फेरफार रद्द केला होता.  उपविभागीय अधिकारी यांच्या निर्णयाचे पत्र महापालिकेस मिळाल्या नंतर ७ एप्रिल २००७ रोजी पालिकेने टीडीआर वापरण्यास स्थगिती दिली. 

धक्कादायक बाब म्हणजे विकास हक्क प्रमाणपत्र वापरण्यास पालिकेनेच स्थगिती दिली असताना देखील मौजे गोडदेव सर्वे क्र. ३१२ / ४, ५ व ३२५ / २ ह्या जागेत त्या स्थगित टीडीआरचा वापर करून  १४ ऑक्टोबर २००८ रोजी महापालिकेच्या नगररचना कडूनच बांधकाम परवानगी दिली गेली . 

या प्रकरणी तक्रारी होत असताना १५ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांनी विकासक सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन व वास्तुविशारद डी. एन. पटेल असोसिएट ला दिलेल्या पत्रात ,   सदर बांधकाम परवानगीस स्थगिती देत अन्य विकास हक्क प्रमाणपत्राचा वापर करून नव्याने प्रस्ताव सादर करण्यास तसेच ७ दिवसात खुलासा सादर न केल्यास कार्यवाहीचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्या आधी १२ मे २०१५ रोजीच्या तत्कालीन नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी अशोक गोयल व अनिस असोसिएट यांना पत्र देऊन खुलासा मागवत कारवाईचा इशारा दिला होता. 

परंतु प्रत्यक्षात मात्र महापालिकेने कोणतीच ठोस कारवाई केली नाही. स्थगित टीडीआर वापरल्याने गुन्हा दाखल करण्यासह वाढीव परवानगी रद्द करणे तसेच वाढीव बांधकाम थांबवणे व तोडून टाकणे आवश्यक असताना महापालिकेने तसे काही केलेच नाही उलट इमारत बांधकाम पूर्ण होऊ दिले असे आरोप होत आहेत. 

 या प्रकरणी रश्मी प्रॉपर्टीज व त्यांच्या प्रतिनिधी आणि वकिलां मार्फत तक्रारी केल्या आहेत. तरी देखील महापालिकेने सदर गैरप्रकारांना पाठीशी घालणे सुरूच ठेवले आहे. रामदेव पार्क जवळ हिया रिजन्सी या नावाने इमारत बांधून पूर्ण झाली आहे. यामुळे खरेदीदार नागरिकांची फसवणूक पालिकेने होऊ दिल्याचा आरोप होत आहे. तर सदर इमारतीच्या वाढीव बांधकामास पालिकेने भोगवटा दाखला दिलेला नाही असे उत्तर महापालिकेचे सहायक संचालक नगगरचना हेमंत ठाकूर यांनी २३ जुलै रोजी तक्रारदारास दिले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक