शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

आघाडीला दुसरा धक्का; काँग्रेस आमदार गोरंट्यालही राजीनाम्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 1:46 PM

शिवसेना नेते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत आधीच महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच गोरंट्याल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.

रवींद्र देशमुखमुंबई - राज्यात महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तारही झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालं नाही. परंतु, खाते वाटपापूर्वीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नाराजीचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यानंतर जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्यालही महाविकास आघाडीला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भातील निर्णय आपण कार्यकर्त्यांवर सोपविल्याचे  गोरंट्याल यांनी म्हटले आहे.

मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने कैलास गोरंट्याल नाराज आहेत. ही नाराजी आता समोर आली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. जालना विधानसभा मतदार संघातून आपण तीनवेळा विजय मिळवला. अर्जुन खोतकर यांच्यासारखा प्रतिस्पर्धी असताना जालना जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवले. एवढच नाही तर जालना नगर परिषदही काँग्रेसच्या ताब्यात ठेवली. परंतु, यावेळीही पक्षाकडून डावलण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी डावलून पक्षाने आपल्यावर मर्यादा घातल्याचे सांगत गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

शिवसेना नेते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत आधीच महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच गोरंट्याल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीमध्ये देखील अशाच प्रकारची नाराजी उफाळून आली होती. आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र पक्षाकडून त्यांची समजूत काढण्यात आली होती. आता गोरंट्याल यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेतृत्व यशस्वी ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.