Maharashtra Government: आणखी एक गायब आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 14:33 IST2019-11-24T10:17:52+5:302019-11-24T14:33:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Maharashtra Government: आणखी एक गायब आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांच्यासोबत गेलेले काही आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. काल ठामपणे अजित पवार यांच्याबरोबर असल्याचं सांगणारे आमदार अनिल पाटील यांनी यू-टर्न घेतला आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहे, माझा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, मा.अजितदादा पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो तिथे काय होणार आहे या बाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही ! कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या फेसबुक पोस्टचा फोटो राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी ट्विट केला असून, ते लवकरच स्वगृह परततील, असा आशावाद व्यक्त केला आहे.
और एक गायब विधायक ने आने के संकेत दिए ...… pic.twitter.com/5AeYh16D9K
— Nawab Malik (@nawabmalikncp) November 24, 2019
राष्ट्रवादी पक्षाने निवडून आलेल्या सदस्यांची यादी तयार केली होती. या यादीवर आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ही यादी बैठकीच्या वेळी तयार केली होती. मंडळाचे नेते म्हणून ही यादी त्यांच्याकडे होती. अंतर्गत कारणासाठी सह्या घेण्यात आल्या होत्या. त्या 54 जणांच्या पाठिंब्याची यादी म्हणून त्यांनी राज्यपालांना दाखवली की काय? आणि राज्यपालांची फसवणूक केली का असा प्रश्न आपल्यासमोर आहे, असेही शरद पवार म्हणाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रपतीपुढे नेले जाणार आहे. आमच्याकडे बहुमत आहे हे लक्षात येताच राज्यातील फडणवीस सरकार राष्ट्रपतींना बरखास्त करावे लागेल. त्या दृष्टीनेही आमची चाचपणी सुरू आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.