शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांचा मुलगा सलीलचे फाऊंडेशनही ‘आयकर’च्या रडारवर; ४८ तासांपासून सुरू आहे कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 12:09 IST

देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी पथकाने विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. ४८ तासांपासून विभागाचे पथक सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत.

नागपूर : आयकर विभागाच्या पथकाने शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित संस्थांची चौकशी केली. सूत्रांनुसार, देशमुख यांचे पुत्र सलील यांचे कोशिश फाऊंडेशनसुद्धा चौकशीच्या घेऱ्यात आले आहे.  आयकर विभागाच्या पथकाने फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली. 

देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी पथकाने विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. ४८ तासांपासून विभागाचे पथक सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत. विभागाकडून अजूनपर्यंत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार  सीए किशोर देवानी यांच्या घरी व कार्यालयात विभागाचे पथक पोहोचले होते. देशमुख यांच्याशी संबंधित शंकरनगर येथील रचना गॅलेक्सी अपार्टमेंट येथील फ्लॅटची तपासणी करण्यात आली. शनिवारी मिडास हाईट्स, रामदासपेठ येथील देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयात  विभागाने कारवाई केली. फेटरी येथील नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीसोबतच देशमुख यांच्या सिव्हील लाईन्स व काटोल येथील निवासस्थानीसुद्धा पथकाने तपासणी केली.

शैक्षणिक संस्थेच्या दानाचीही चौकशी - सूत्रानुसार, देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेला मिळालेल्या ४.१८ कोटी रुपयांच्या दानाचीही चौकशी केली जात आहे. हे पैसे दिल्ली येथील चार कंपन्यांनी श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा केले होते. - तर १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात तपास यंत्रणा आणखी सक्रिय झाल्या आहेत. देशमुख यांच्याविरुद्ध ईडीद्वारा लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय