शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:20 AM

पवारांच्या दाव्यानंतर आता अनिल देशमुखांसदर्भात, काही डॉक्युमेंट्स समोर आले आहेत. यावरून, या काळात अनिल देशमुख यांनी चारटर्ड विमानाने प्रवास केल्याचे दिसते. यानंतर अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे. यानंतर गृह मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे प्रत्येकाच्याच निशाणावर दिसत आहेत. एवढेच नाही, तर याच मुद्द्यावर देशाच्या संसदेतही जबरदस्त गदारोळ पाहायला मिळाला. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही परमबीर सिंगांनी केलेल्या आरोपांची सारवासारव करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन, फेब्रुवारी महिन्यात बराच काळ अनिल देशमुख रुग्णालयात आणि नंतर आपल्या घरी क्वारंटाइन होते, असा दावा केला होता. मात्र, त्यांच्या या दाव्यानंतर आता देशमुखांसंदर्भात नव-नव्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. (Anil Deshmukh on Nagpur Mumbai charted flight document of 15 february)

पवारांच्या दाव्यानंतर आता अनिल देशमुखांसदर्भात, काही डॉक्युमेंट्स समोर आले आहेत. यावरून, या काळात अनिल देशमुख यांनी चारटर्ड विमानाने प्रवास केल्याचे दिसते. यानंतर अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.

पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार गोंधळले, चिडले अन् म्हणाले “इनफ इज इनफ”!

राज्यात अनिल देशमुख यांच्यावरून सुरू असलेल्या चर्चेतच चार्टर्ड विमानाचे डॉक्यूमेंट समोर आले आहे. हे डॉक्युमेंट 15 फेब्रुवारी, 2021चे आहे. यात प्रवाशांच्या यादीत अनिल देशमुखांचेही नाव आहे. यावरून स्पष्ट होते, की 15 फेब्रुवारीला अनिल देशमुखांनी या विमानातून नागपूर-मुंबई प्रवास केला होता.

अनिल देशमुखांनी व्हिडिओ जारी करत दिलं स्पष्टिकरण -यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, की " गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे. काही ठिकाणी माध्यमांतूनही चुकीच्या बातम्या येत आहेत. यामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. नागपूरमध्ये असतानाच 5 फेब्रुवारीला मला कोरोनाची लागण झाली. यानंतर मी तेथील रुग्णालयात भरती होतो. 15 फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर होम क्वारंटाइनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो. यासंपूर्ण काळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमाने बैठकांमध्ये भाग घेत होतो." या शिवाय, गृह मंत्री म्हणून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण संपूर्ण राज्याचा दौरा करत होतो, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. 

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

काय म्हणाले होते शरद पवार -परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार  ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे. त्यांना १५ फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी मिळाली; त्यानंतर १५ दिवस ते घरीच विलगीकरणात होते. देशमुख रुग्णालयात भरती असल्याचा रेकॉर्ड आहे.   २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना घरीच आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला होता. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यता नाही. 

१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख क्वारंटाईन होते, मग हे कोण?; व्हिडीओ दाखवत फडणवीसांचा पवारांना सवाल

आता, अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारी रोजी नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास केल्याचे एका कागदपत्रातून समोर येत आहे. देशमुख यांच्यासह 8 जणांनी हा प्रवास केला असून त्यात पूजा देशमुख यांचाही समावेश आहे. एका खासगी विमानाने ते नागपूरहून मुंबईला आले. त्यामुळे या विमानप्रवासाच्या कागदपत्रामुळे पुन्हा एकदा गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझे