शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; अनिल देशमुख यांचीही याचिका; कॅव्हेटही दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:50 IST

ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या गुन्हेगारी रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्ली : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आपल्या सरकारी निवासस्थानात बोलावून मुंबईतील बार व हॉटेलचालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये खंडणी स्वरूपात गोळा करण्याचा आदेश दिल्याचा आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी केली जावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका मंगळवारी महाराष्ट्र शासन आणि स्वत: अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी पदावरून अन्यत्र बदली होताच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्याविषयी तक्रार केली होती. त्यानंतर परमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली; परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार परमबीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परमबीरसिंह यांच्याबरोबरच आणखी दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांना ‘खडे बोल’ सुनावत त्यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर का नाही दाखल केला, असा प्रश्न उपस्थित केला. ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या गुन्हेगारी रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या आदेशाला आव्हान देणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. एक याचिका महाराष्ट्र शासनाने तर दुसरी याचिका खुद्द अनिल देशमुख यांनी दाखल केली. देशमुख यांच्याविरोधात गुन्हेगारी रिट याचिका दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनीही मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. वरील याचिकांवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, असे या कॅव्हेटमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या याचिकेतील मुद्देआपली बाजू मांडण्याची संधीही न देता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देणे हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. सीबीआयकडे स्वत:चा पूर्णवेळ संचालक नाही. त्यासंदर्भात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. अशा स्थितीत सीबीआयच्या हंगामी संचालकांकडे चौकशीची सूत्रे सोपविणे योग्य ठरणार नाही

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुख