शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अन् अश्व दौडला माऊलींच्या दर्शना.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 8:55 PM

  माऊलींचे पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी परीसरातील जमलेल्या लाखो वैष्णवांनी उभा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. 

ठळक मुद्देचांदोबांचा लिंब : माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण 

तरडगाव : दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा।।भक्तिने भारलेला रिंगण सोहळा ।पाहावा याचि देही याचि डोळा ।।

  अश्व दिसण्याची आस....माऊली माऊलीचा जयघोष.....शिस्तबध्द  रांग... माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड...वारकºयांच्या पायांनी धरलेला ठेका...टाळ-मृदुगांच्या गजराच्या  संचारलेल्या उत्साहात उभ्या रिंगणाचा  नेत्रदीपक सोहळा  'चांदोबाचा लिंब'  येथे उत्साहात पार पडला.  माऊलींचे पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी परीसरातील जमलेल्या लाखो वैष्णवांनी उभा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.     माऊलींची पालखी लोणंद येथून बुधवारी दुपारी आरती झाल्यानंतर एक वाजता मार्गस्थ झाली.चार वाजता चांदोबा लिंब येथे रिंगण सोहळ्यासाठी पोहचली. सोहळा चार वाजून पंधरा मिनिटांनी सुरू झाला. 

    पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार असल्याने वारकºयाची व वैष्णवांची पावले लगबगीने चांदोबाच्या लिंब या दिशेने पडत होती. रस्त्यांच्या दुतर्फा असणाºया स्थानिक नागरिकांच्या चेहºयावरून आनंद ओसांडून वाहत होता. रस्त्याकडील बाजूला असणाºया शेतामध्ये ठिकठिकाणी फुगडीचा फेर, भारूडं, भजने रंगली होती.   सकाळी ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत होता. मात्र दुपारी दोन नंतर हवेत गारवा जाणवू लागला. मध्येच गरव्याची येणारी वाºयाची हलकी  झुळुक आनंदात भर घालत  होती.  माऊलीचे उभे रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमधील भक्त आणि  वारकºयांनी या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.            अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आशीर्वाद असतो, या भावनेने अश्व ज्या ठिकाणाहून गेला. तेथील त्याच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.       नेत्र दीपक सोहळा पार पडल्यानंतर भक्तांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. चोपदाराने दंडक उचवल्यानंतर  उत्साहात, आनंदात पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. सोहळ्यानंतर स्थानिक भक्त परतीच्या वेळी फुगडीचे फेर धरत होते, तर कोणी नाचत होते. एकुणच चांदोबाचा लिंब येथे वैष्णवांचा आनंद मेळावा भरला होता...........

चोपदाराने चोप उभारताच पसरली शांतता

माऊलींचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला तेव्हा गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी, चोपदार  यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. त्याचवेळी गदीर्तील लाखो वारकरी दुतर्फा झाले व मध्ये अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. रिंगण लाऊन घेतल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजाऱ्यांनी दौडत आणला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील २० दिंड्यापर्यंत नेल्यांनतर पुन्हा परत माघारी पळत आला. माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालुन नैवद्य दाखविला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे स्वारीचा अश्व आणि मागे माऊलींचा अश्व अशी शर्यतीची दौड पूर्ण झाली...........

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी