Amruta Fadnavis : थोडक्यात उत्तरे द्या, Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले...; अमृता फडणवीसांचं ट्वीट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 20:19 IST2022-01-29T20:19:26+5:302022-01-29T20:19:32+5:30
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला डिवचलं आहे.

Amruta Fadnavis : थोडक्यात उत्तरे द्या, Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले...; अमृता फडणवीसांचं ट्वीट चर्चेत
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मतही व्यक्त करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयावरून राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. आता अमृता फडणवीस यांनीदेखील या निर्णयाचा समाचार घेतल्याचं दिसत आहे.
अमृता फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. "थोडक्यात उत्तर द्या, ५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले..... या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स ! _____शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है !" असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
थोडक्यात उत्तर द्यावे ...५० मार्क्स ;
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 29, 2022
Naughty नामर्द,
बिगड़े नवाब,
नन्हें पटोले .....
या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?
रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स !
_____शराब नही होती !
हरामख़ोर का मतलब _____है और
सुनने में आया है _____नामर्द है !#WakeUp#Confused
नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती