Amruta Fadnavis gives birthday wishes to PM as Father of our Nation | मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना 'राष्ट्रपिता' म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा 
मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना 'राष्ट्रपिता' म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा 

पुणे : व्यवसायाने बँकर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस एका नव्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी त्यांचा उल्लेख 'फादर ऑफ अवर कंट्री ' असा केला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांची उपाधी वापरून मोदी यांना शुभेच्छा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इतक्यात अमृता फडणवीस प्रसिद्धीत येत असतात. बँकेत उच्चपदावर काम करणाऱ्या अमृता या गायिकाही आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांतही त्या सहभागी होत असतात. यापूर्वीही बोटीवर सेल्फी घेणे, फॅशनेबल फोटोशूट अशा कारणांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. पण त्याही वेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. यावेळी मात्र पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करताना त्यांनी राष्ट्रपिता म्हणताना त्यांचे समाजाच्या विकासासाठी सुरु असलेले काम प्रेरणादायी आहे असाही उल्लेख केला आहे. 


Web Title: Amruta Fadnavis gives birthday wishes to PM as Father of our Nation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.