अहंकारी वृत्ती नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन: अमोल मिटकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:02 IST2020-02-11T13:56:28+5:302020-02-11T14:02:13+5:30
दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्याने दिल्लीत त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे.

अहंकारी वृत्ती नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन: अमोल मिटकरी
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे, तर काही तासात निकाल हाती येणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, अहंकारी वृत्ती नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला आहे.
मिटकरी यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, दिल्लीतील भाजपची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीला प्रचाराला बोलावल्यावर खऱ्या अर्थाने उतरती कळा लागलीय. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी चिंतन करायला हवे. तसेच अहंकारी वृत्तीला नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन, म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
दिल्लीतील भाजपा ची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीला प्रचाराला बोलावल्यावर खऱ्या अर्थाने उतरती कळा लागलीय. यावर मा. मोदीजी व अमित शहाजी यांनी चिंतन करायला हवे. अहंकारी वृत्ती ला नाकारल्या बद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन ll@PawarSpeaks@supriya_sule
— Amol mitkari (@amolmitkari22) February 11, 2020
दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्याने दिल्लीत त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळेच आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. 'दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे.