शेलपिंपळगाव : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीपूर्वीच कार्यकर्त्यांनी शिरूरचा खासदार ठरवण्याची किमया लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागणार की काय, अशी चर्चा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.शिरूर लोकसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव - पाटील विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार श्री. संभाजीमहाराज फेम डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच रंगली. डॉ. कोल्हे हे माळी समाजाचे आहेत, खोटी दाढी - मिशा लावतात, ते माणसांचे डॉक्टर आहेत की जनावरांचे, मराठी टायगर्समधील चित्रीकरण, छत्रपती उदयनराजेमहाराज यांच्या विरुद्ध लढण्यास विचारण्यात आल्याने शिवसेना सोडली, यासह अनेक आरोपांमुळे या लढतीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. परिणामी, शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.