शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah Maharashtra Visit: अमित शाहांच्या दौऱ्यामुळे पक्षात चैतन्य, महायुतीच्या विजयासाठी भाजपा सज्ज- चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:02 IST

Amit Shah Maharashtra Visit, BJP: मविआने केलेल्या खोट्या प्रचाराचा भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन भांडाफोड करतील, असेही ते म्हणाले.

Amit Shah Maharashtra Visit, BJP: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौर्‍यात पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमाने काम करेल, असा विश्‍वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या मनात महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील, त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती देतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २४, २५ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका घेतल्या. या दौर्‍यामध्ये जवळपास 5 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी श्री. शाह यांनी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय असावा, महायुतीचा विजय व्हावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याविषयी अमित शाह यांनी मार्गदर्शन केले."

"बूथ पातळीवरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात केंद्र आणि राज्य सरकार विषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची सूचना श्री. शाह यांनी केली आहे. त्यादृष्टीने पक्ष कार्यकर्ते बूथपातळीवर सक्रीय होतील,पक्ष कार्यकर्त्यांनी बूथपातळीपर्यंत सामान्य जनतेशी संपर्क साधावा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, सरकारची चांगली कामगिरी आणि संघटनेची ताकद याच्या जोरावर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणणे, यासाठी अमित शाह यांनी या संघटनात्मक बैठकांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना विजयाचा मंत्र दिला", असे बावनकुळे यांनी सांगितले.

अमित शाह यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांना केलेल्या मागदर्शनामुळे संघटनेत उर्जा निर्माण झाली आहे. अमित शाह यांनी संघटन शक्ती मजबूत करण्याच्या आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याचा दिलेल्या मूलमंत्राचे आम्ही पालन करू आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahayutiमहायुती