शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

शिवसेना-भाजपा युती तुटण्याला ती एकच व्यक्ती जबाबदार?; संजय राऊतांनी थेट नाव घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:17 IST

मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत. ते शिवसेना-भाजपा युतीचे समर्थक राहिलेत. जी जुनी पिढी एकत्र होती त्यात चंद्रकांत पाटलांसारखे नेते होते. कदाचित भाजपात जे हौसे नवसे आणि गवसेआलेत त्यांना २५ वर्षातील आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही. आता जे आहेत त्यांचा ना भाजपाशी संबंध ना हिंदुत्वाशी संबंध..चंद्रकांत पाटील यांच्या भावना या त्यांच्या पक्षात अनेकांच्या आहेत. आम्ही एकत्र २५ वर्ष उत्तम पद्धतीने काम केले. नरेंद्र मोदी यांच्यासोबतही आम्ही चांगले काम केले पण दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपात वितुष्ट आलं असं सांगत खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपा युती तुटण्याला शाह यांनाच जबाबदार धरलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यांच्यासारख्या भावना आमच्या पक्षातील नेत्यांमध्येही असू शकतात. आम्ही महाविकास आघाडीत गेलो त्याला कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीतील काही लोकांचा हट्ट आहे. २५ वर्षाची आमची युती ज्या कारणांसाठी तुटली ती कारणे पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता तो तुम्ही आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेना दिला. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रि‍पदाचा दावा आणि हक्क तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला असं त्यांनी सांगितले. 

तसेच जेव्हा आम्ही मागणी केली होती, तेव्हा अमित शाहांनी ती मागणी नाकारली. अमित शाह यांनी ठरवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती. त्यांचे आर्थिक हितसंबंध या मुंबईत गुंतले होते. आजही एकनाथ शिंदेंचा वापर ते त्यासाठीच करतायेत असा आरोप राऊतांनी केला.

एकनाथ शिंदेंचा गट फुटणार?

दरम्यान, मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत किती काळ राहील आणि किती वेळ टिकवला जाईल याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल. त्यांचा गट विस्कळीत होईल. आज केवळ सत्ता आणि पैसा या जोरावर ते एकत्र आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही असंही संजय राऊतांनी दावा केला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाह