शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 

By शेखर पानसरे | Updated: November 17, 2024 12:10 IST

आमदार लहामटे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे वैभव पिचड हे  अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.

शेखर पानसरे, अकोले Maharashtra Elections 2024: कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे, शरद पवार गटाचे अमित भांगरे व अपक्ष वैभव पिचड असा तिरंगी सामना होत आहे. महायुतीमहाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. निवडणुकीत चुरस असून, मत विभागणीमुळे कुणाचे पारडे जड होणार ? याकडे लक्ष लागले आहे.

माजी आमदार वैभव पिचड यांनी गतवेळी भाजपत प्रवेश करून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांना पराभूत केले होते. पिचड घराण्याची ४० वर्षांची सत्ता पायउतार झाली. पूर्वी काँग्रेस विरुद्ध कम्युनिस्ट-समाजवादी, अशी लढत व्हायची. या मतदारसंघात  तिरंगी लढतीचा माजी मंत्री मधुकर पिचड यांना सतत फायदा होत गेला. 

आमदार लहामटे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे वैभव पिचड हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.  आघाडीने अमित भांगरे यांना उमेदवारी देताच उद्धव ठाकरे गटाचे मधुकर तळपाडे व मारुती मेंगाळ यांनी बंडखोरी केली आहे.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे    

आमदार लहामटे यांनी विकास कामासाठी अडीच हजार कोटींचा निधी आणला. विकास कामे केली, असा लहामटे समर्थकांकडून प्रचार केला जात आहे. 

विकास कामांविरुद्ध विरोधक आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्याशी गद्दारी, असे मुद्दे उपस्थित करत विरोधकांनी रान उठवले आहे. व्यक्तिगत टीकाटिप्पणीपर्यंत प्रचार पोहचला आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड हे रुग्णालयात उपचार घेत असल्याने प्रत्यक्ष प्रचारात नाहीत. पण, त्यांनी केलेली ४० वर्षांची कामे यातून सहानुभूतीपूर्वक मांडली जात आहेत.

विकास, सहानुभूती, कोणी किती त्याग केला, या भोवती प्रचार घोंगावत असला, तरी मत विभाजन हा फॅक्टर नेमका कोणाच्या तोट्याचा हे मतदानातून निश्चित होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकakole-acअकोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी