लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : एका भरधाव कारचालकाचा ताबा सुटल्याने शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अंबरनाथमध्ये भीषण अपघात झाला. कारचालकाने उड्डाणपुलावरील तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक लक्ष्मण शिंदे यांचाही मृत्यू झाला.
शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर सायंकाळी पूर्व भागातून पश्चिम भागात जाणाऱ्या एका भरधाव कारचालकाचा ताबा सुटल्याने त्याने दुचाकीस्वारांना अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून उडून पुलाखाली पडला. या सगळ्या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
अंबरनाथमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदेसेनेचे उमेदवार किरण चौबे या चौक सभेसाठी कारमधून पश्चिमेतील बुवापाडा येथे जात असताना, हा अपघात झाला. भरधाव वेगात कार असताना चालक शिंदे यांचा कारवरील ताबा सुटला. या अपघातातून उमेदवार चौबे थोडक्यात बचावल्या. अपघातामध्ये अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागात काम करणारे शैलेश जाधव यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने अंबरनाथ शहरावर शोककळा पसरली आहे. तर, उड्डाणपुलावर या अपघातामुळे मोठी वाहतूककोंडी झाली होती.
Web Summary : A speeding car lost control on Ambernath flyover, killing four, including the driver. Shinde Sena candidate Kiran Choube escaped unharmed while en route to an election rally. The accident caused a major traffic jam and grief in the city.
Web Summary : अंबरनाथ फ्लाईओवर पर तेज रफ्तार कार अनियंत्रित होकर दुर्घटनाग्रस्त हो गई, जिसमें ड्राइवर समेत चार लोगों की मौत हो गई। शिंदे सेना के उम्मीदवार किरण चौबे चुनाव रैली के लिए जाते समय बाल-बाल बच गए। दुर्घटना से शहर में शोक और यातायात जाम हो गया।