शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या हजार मंडळांनी घेतली परवानगी

By admin | Updated: September 5, 2016 01:22 IST

शहरातील गणेश मंडळांची संख्या सहा हजार इतकी असताना शेवटच्या दिवशीपर्यंत केवळ ७५१ मंडळांनी परवानगी घेतली

पुणे : शहरातील गणेश मंडळांची संख्या सहा हजार इतकी असताना शेवटच्या दिवशीपर्यंत केवळ ७५१ मंडळांनी परवानगी घेतली आहे, तर २५० मंडळे परवानगीच्या प्रक्रियेत आहेत. अनेक मंडळे रितसर परवानगी घेत नसल्याने त्यांच्यावर महापालिकेचे व पोलिसांच्या कोणत्याही नियम व अटींचे बंधन राहत नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.गणेशोत्सव शांततेमध्ये पार पडावा, यासाठी गणेश मंडळांनी रितसर परवानगीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळांना आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे; मात्र अनेक मंडळे या प्रक्रियेपासूनच दूर राहत असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडप धोरण तयार केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या ५ दिवस अगोदर गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये मंडपाची लांबी, रुंदी, उंचीची मापे, मागील वर्षीच्या परवान्याची प्रत, वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र, मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव, पत्ते व फोटो जमा करणे आवश्यक आहे. मंडपाची उंची ४० फुटांची नसावी, जर ४० फुटांपेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारायचा असल्यास अधिकृत स्थापत्य अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेणे बंधनकारक आहे. १७७ कमानींना परवानगीशहरातील ७५१ गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी १७७ कमानींसाठी महापालिकेने परवानगी दिली आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांनी दिली.परवानगी घेण्याची प्रक्रिया सुलभ केली असतानाही गणेश मंडळे या प्रक्रियेपासून दूर राहत आहेत. यामुळे आत्पकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड जाऊ शकते. गणेश मंडळे परवानगीसाठी येतच नसल्याने त्यांच्याकडून आखून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी ऋषीकेश बालगुडे यांनी याबाबत सांगितले, ‘महापालिकेकडून परवानगी देताना अडवणूक केली जाते. सर्व कागदपत्रे सादर करूनही लवकर परवानगी मिळत नाही. शेवटच्या दिवशीपर्यंत परवानगी दिली जात नाही, त्यामुळे मंडळे परवानगी घेण्यासाठी टाळाटाळ करतात.’