शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सत्तेत असलेले मित्रपक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आमने - सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 11:51 IST

महाविकास आघाडीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची अडचण 

ठळक मुद्देमहाआघाडीतील मित्रपक्ष जिल्ह्यात पारंपारिक विरोधक जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व 

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील निम्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 748 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा रणसंग्राम सध्या जिल्ह्यात सुरू झाला आहे. परंतु राज्यात सत्तेत असलेले मित्रपक्ष जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. या महाविकास आघाडीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. 

कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2020 अखेर पर्यंत मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यातील तब्बल 748 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यासाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

राज्यात सरकारमध्ये मित्र पक्ष असलेलेचे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर एकमेकाचे कट्टर विरोधक आहे. यामुळे मात्र स्थानिक पातळीवर आमदार, खासदार, अन्य पदाधिकारी यांची चांगलीच अडचण झाली आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काही तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव , खेड , पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना आमनेसामने आहेत. तर भोर , वेल्हा आणि मुळशी तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकाचे कट्टर विरोधक आहेत. तर शिरूर,  मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. बारामती, इंदापूर,  दौंड तालुक्यात देखील राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान आहे. यामुळे गेले वर्षभर राज्यात सत्तेत एकत्र असलेले मित्र पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आमनेसामने उभे राहणार असल्याने हा रणसंग्रामा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. --------जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायतीखेड -91, भोर-73, शिरूर-71, जुन्नर-66, पुरंदर-68, इंदापूर-60, मावळ - 57, हवेली- 54, बारामती- 52, दौंड - 51, मुळशी - 45, वेल्हा - 31, आंबेगाव- 29, पिंपरी-चिंचवड- 1 , एकूण : 748  ---------असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम -  तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे : १५ डिसेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणे : २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर - उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 4 जानेवारी 2021 - मतदान : 15 जानेवारी 2021- मतमोजणी : 18 जानेवारी -------जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व पुणे जिल्ह्यात 1407 ग्रामपंचायती असून, यात बहुतेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर काही तालुक्यात शिवसेना, काँग्रेस आणि भाजपची देखील चांगली ताकद आहे. ------महाआघाडीतील मित्रपक्ष जिल्ह्यात पारंपारिक विरोधक राज्यात महाआघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस,  काँग्रेस आणि शिवसेना पुणे जिल्ह्यात एकमेकांचे पारंपारिक विरोधक आहेत. तरी देखील अनेक वेळा ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक परिस्थितीवर निर्णय घेतला जातो. काही ठिकाणी महाआघाडीतील पक्ष एकत्र येऊ शकतात तर काही ठिकाणी भाजपला देखील बरोबर घेतले जाऊ शकते.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण