लोकमत न्यूज नेटवर्क कराड (जि. सातारा) : ‘महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी भाजप व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरीत्या घेतला आहे. ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे मत राष्ट्रवादी (अजित पवार)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः ‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार?’ याबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. राष्ट्रवादीची भूमिका अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आधीच निश्चित झालेली असून, त्याच मार्गाने वाटचाल करणे, हे आमचे कर्तव्य आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
भाजपशी चर्चा करूनच निर्णय होईल : भुजबळ
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अजितदादांची काय चर्चा झाली, याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही. आता बदललेल्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करावी लागेल. आम्ही सत्तेत ज्या भाजपसोबत आहोत, त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांना विचारावे लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे माध्यमांसमोर मांडले.
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करा
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र अजित पवार गटाच्या ३० आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोमवारी दिले. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्याच दिवशी काही आमदारांनी या संदर्भातील पत्रावर सह्या केल्या आहेत.
Web Summary : NCP (Ajit Pawar) emphasizes clarity on potential mergers within NDA. Sunil Tatkare stresses collective decision to join for Maharashtra's benefit. Bhujbal suggests discussing the merger with BJP leaders. MLAs propose Sunetra Pawar as national president.
Web Summary : राकांपा (अजित पवार) ने एनडीए में संभावित विलय पर स्पष्टता पर जोर दिया। सुनील तटकरे ने महाराष्ट्र के लाभ के लिए शामिल होने के सामूहिक निर्णय पर जोर दिया। भुजबल ने भाजपा नेताओं के साथ विलय पर चर्चा करने का सुझाव दिया। विधायकों ने सुनेत्रा पवार को राष्ट्रीय अध्यक्ष बनाने का प्रस्ताव रखा।