शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती! - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 06:19 IST

भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे. युती असली, तरी भाजपा किंवा राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही.

कल्याण : भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे. युती असली, तरी भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडणार नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केला.विठ्ठलवाडी बस डेपोजवळच्या मैदानात उभारलेल्या गंगाधर पानतावणे साहित्यनगरीत अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात ते बोलत होते. आठवले जातीयवादी पक्षासोबत असल्याने त्यांच्यावर समाजाचा रोष आहे. अंबरनाथ येथे भाजपाच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने आठवले यांना मारहाण केली होती. पक्षांतर्गत वाद हे मारहाणीचे कारण नसून, आठवले हे भाजपासोबत गेल्याने त्यांच्या विरोधात समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे, असे वक्तव्य आंबेडकरी विचारवंतांनी केले होेते. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी हा खुलासा केला.आठवले म्हणाले की, ‘समाजातील प्राध्यापक, साहित्यिक यांच्यासोबत पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी बैठका घेऊनच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यापुढेही सर्वांना विचारात घेऊ नच निर्णय घेतला जाईल,’ असे सांगताना ‘माझ्या हातात आहे झेंडा निळा, त्यामुळे अनेकांच्या पोटात उठला आहे गोळा,’ अशी कविताही त्यांनी केली. या प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे, शिवसेना नगरसेवक नवीन गवळी यांचा आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संविधान बदलणाऱ्यांचे हात तोडू!संविधान तयार झाल्यावर अन्याय-अत्याचार कमी झाले. संविधान बदलण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्यांचे हात तोडण्याचे काम आम्ही करू, असा इशारा आठवले यांनी या वेळी दिला. नदीजोड प्रकल्पाचे खरे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साहित्यिकही होते. साहित्याचा वारसा त्यांनी खºया अर्थाने जपला. त्यामुळे साहित्यिकांचा मी आदर करतो. साहित्यिक माझा आदर करतात की नाही, ते मला ठाऊक नाही, असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणBJPभाजपा