शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

तीनही केंद्रीय तपास यंत्रणा करणार परमबीर सिंग यांची सखोल चौकशी, न्यायालयाच्या बडग्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 11:02 AM

आतापर्यंत केवळ स्थानिक पोलीस व सीआयडीच्या चौकशीच्या रडारवर असलेल्या परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

जमीर काझी -मुंबई : आपल्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना आता तीनही केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्याला सामोरे जावे लागणार आहे. कारमायकल रोड येथील कारमधील स्फोटके, मनसुख हिरेन हत्या आणि मुंबईतून पोलिसांनी केलेली हप्ता वसुली प्रकरणात त्यांनी बजावलेल्या जबाबदारीची पडताळणी अनुक्रमे एनआयए, सीबीआय आणि ईडीकडून केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना लवकरच स्वतंत्रपणे समन्स बजावले जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.आतापर्यंत केवळ स्थानिक पोलीस व सीआयडीच्या चौकशीच्या रडारवर असलेल्या परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. उच्च न्यायालयाने याबाबत सीबीआयची कानउघडणी केल्याने त्यांच्यासह तीनही एजन्सीना त्यांची भूमिका तपासणे अपरिहार्य बनल्याचे सांगण्यात येते. परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांबरोबरच सरकारमध्ये मोठी उलथापालथ झाली होती. त्यापूर्वी कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरण त्यासाठी निमित्त ठरले. या गुन्ह्यासह सचिन वाझेकडून करण्यात आलेल्या हप्ता वसुलीच्या आतापर्यंतच्या तपासमध्ये परमबीर सिंग यांना काहीसे अलिप्त ठेवण्यात आले होते. केवळ राज्य सरकार व अनिल देशमुख हेच ‘टार्गेट’ असल्याच्या दृष्टीने तपास सुरू होता. मात्र, ‘एनआयए’ने वाझेपाठोपाठ वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला अटक केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या. त्याच्याकडील चौकशीतून आयुक्त म्हणून परमबीर यांनी बजावलेली भूमिका संशयास्पद असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील सुनावणीमध्ये भ्रष्टाचाराचा तपास केवळ राजकीय व्यक्तीपुरता मर्यादित न ठेवता पोलीस प्रशासन प्रमुखाची भूमिका तपासण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे सीबीआयला तत्कालीन आयुक्त परमबीर यांचीही चौकशी करावी लागणार आहे.सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यापासून ते मोक्याची पोस्टिंग आणि सर्व तपासकामे देण्यात परमबीर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सीबीआयला त्यांच्याकडे कसून चौकशी करावी लागणार आहे.सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेल्या ईडीने देशमुख व त्यांचे पीए यांना रडारवर ठेवले होते. मात्र, वाझे वसुली करत असताना परमबीर सिंग यांनी त्याला संमती का दिली होती, याचा ईडीला जबाब घ्यावा लागणार आहे.

विरोध डावलून निवड- एपीआय सचिन वाझेचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाला तत्कालीन सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी विरोध केला होता, तर त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेत ‘सीआययू’ नेमण्याला तत्कालीन सहआयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी यांनी विरोध केला होता. - मात्र, सिंग यांनी तो डावलून प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून वाझेवर सर्व महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. दोघे वरिष्ठ अधिकारी सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय