शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

Uddhav Thackeray : मोठी बातमी! ७ ऑक्टोबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळं खुली होणार; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 21:36 IST

Uddhav Thackeray All temples in Maharashtra to be reopened from 7th October : राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं ७ ऑक्टोबरपासून खुली होणार

मुंबई: राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मंदिरं उघडण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. ७ ऑक्टोबरला घटस्थापना आहे. त्यामुळेच प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. Uddhav Thackeray All temples in Maharashtra to be reopened from 7th October. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं आजच घेतला. यानंतर भारतीय जनता पक्ष मंदिरं उघडण्यासाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच सरकारनं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा खोचक टोलाअखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याची सुबुद्धी सुचला, असा खोचक टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. मंदिरं उघडण्याची मागणी भाजपनं सातत्यानं लावून धरली आहे. पण मुख्यमंत्री अहंकारातून सगळे निर्णय घेतात. मंदिरं उघडायचीच आहेत ना, मग त्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत का थांबतात. आजचं उघडा ना, असं भातखळकर म्हणाले. श्रावण महिना हिंदूंसाठी पवित्र असतो. तेव्हा का नाही उघडली मंदिरं? हे सरकार केवळ हिंदूंना त्रास देत आहे. मंदिरांवर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यांचा विचार करून हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, असं भातखळकरांनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसे