शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

विदर्भ, मराठवाड्यात सर्वदूर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:20 IST

गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट पहात असलेल्या मराठवाड्याला गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सूनने दिलासा दिला आहे. 

पुणे : विदर्भात जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट पहात असलेल्या मराठवाड्याला गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सूनने दिलासा दिला आहे. येत्या २४ तासात कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील भिरा ८०, अलिबाग ७०, माथेरान, पेण ६०, खालापूर, रोहा, सांगे ५०, कर्जत, लांजा, मंडणगड, राजापूर, वैभववाडी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर ६०, गगनबावडा, राधानगरी ५०, चंदगड, इगतपुरी ४०, पौड मुळशी, पेठ, शाहूवाडी ३० मिमी पाऊस पडला.मराठवाड्यात अर्धापूर, धर्माबाद, मुदखेड, उमरी ७०, बिल्लोरी ५०, नायगाव, खैरगाव ४० मिमी पाऊस झाला. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. विदर्भात मूलचेरा १६०, भामरागड १३०, उमरेड ७०, अहिरी, सिरोंचा ५०, अकोला, भिवापूर, चामोर्शी, चंद्रपूर, धनोरा, इटापल्ली ४० मिमी पावसांची नोंद झाली. घाटमाथ्यावरील दावडी, शिरगाव १३०, कोयना, १२०, डुंगरवाडी १००, ताम्हिणी ९०, अम्बोणे ८०, लोणावळा, वळवण ६० मिमी पाऊस झाला.सध्या मॉन्सून ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि छत्तीसगड या परिसरात सक्रीय आहे. २१ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ आॅगस्ट रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाRainपाऊसkonkanकोकण