"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 19:15 IST2026-04-04T19:04:23+5:302026-04-04T19:15:52+5:30

दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरात होते, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांवी हे आवाहन केले.

"All parties should hold the Baramati assembly by-election unopposed"; Devendra Fadnavis appeals to the opposition | "सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन

"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरात होते, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांवी हे आवाहन केले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं

नाशिकमध्ये लहान मुलांचा बळी घेणाऱ्या दुर्दैवी अपघातावर बोलताना फडणवीस अत्यंत भावूक झाले. ते म्हणाले की, "इतक्या लहान मुलांचे असे निधन होणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचा कठडा अतिशय छोटा असल्याने हा अपघात घडला.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करावी

बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन केले. "सुनेत्रा पवार यांना सर्वच पक्षांनी पाठिंबा द्यावा. महाराष्ट्रात यापूर्वीही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. जेव्हा आर. आर. आबांचे दुःखद निधन झाले होते, तेव्हा भाजपने मोठेपणा दाखवत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि ती निवडणूक बिनविरोध केली होती," अशी आठवण फडणवीस यांनी करून दिली.

Web Title : अजित पवार के निधन के बाद फडणवीस ने बारामती उपचुनाव निर्विरोध कराने की अपील की।

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, फडणवीस ने सभी दलों से बारामती उपचुनाव में सुनेत्रा पवार का समर्थन करने का आग्रह किया, ताकि महाराष्ट्र की निर्विरोध चुनावों की परंपरा जारी रहे। उन्होंने आर.आर. आबा के निधन के बाद भाजपा के पिछले रुख को याद दिलाया। नासिक दुर्घटना पर दुख व्यक्त किया।

Web Title : Fadnavis appeals for unopposed Baramati by-election after Ajit Pawar's passing.

Web Summary : Following Ajit Pawar's death, Fadnavis urges all parties to support Sunetra Pawar in the Baramati by-election, continuing Maharashtra's tradition of unopposed polls, recalling BJP's past gesture after R.R. Aba's demise. He also expressed grief over the Nashik accident.