शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 19:31 IST

पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला.

ठळक मुद्देशिवाजीनगर येथील घटनेचे पडसाद

पुणे : मद्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांना यापुढे सेवेतून तातडीने बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. शिवाजीनगर येथे मंगळावारी (दि. २३) रात्री घडलेल्या प्रकारानंतर महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. या घटनेतील चालकाचीही सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.शिवाजीनगर बसस्थानकातील घटनेप्रमाणे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशा कडक नियमावली प्रशासनाने राबवावी, असे निर्देश श्री. रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत.  जेणेकरून भविष्यात मद्यपान करून गैरवर्तन करणार्यांना कायमचा आळा बसेल.      काल दि. २५ जुलै रोजी पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर अमोल चोले या एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या एसटीच्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला. संबंधित बसच्या वाहकाच्या व प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने अप्रिय प्रसंग टळला. परंतु, सदर घटनेची गांभीयार्ने दखल घेऊन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुण्याचे विभाग नियंत्रकांनी सदर चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याची सूचना निर्गमित केली  आहे.      प्रवासी हे दैवत समजून त्यांना सेवा देणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासामध्ये त्यांना सुरक्षित व सौजन्यशील सेवा देण्याचे व्रत अंगिकारले पाहिजे, जेणेकरून एसटीवरचा प्रवाश्यांच्या अढळ विश्वासाला कोठेही तढा जाणार नाही. उपरोक्त प्रसंगासारख्या गैर कृत्यामुळे एसटीची प्रतिमा मालिन होणार नाही याची काळजी एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन श्री. रावते यांनी याप्रसंगी केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, एसटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकावर कडक कारवाई करून  ज्यापद्धतीने त्यांच्या बेकायदेशीर रिक्षा परिवहन विभागाने तोडून टाकुन, निर्भयपणे काम करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्याला धीर दिला. त्याचप्रमांणे या कारवाईतून, बेशिस्त वर्तन करून प्रवाशांच्या  जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार एसटी कर्मचाऱ्यांना देखील एसटीच्या सेवेतून बडतर्फ करून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्दिष्टाला एसटी कडून कधीही  गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाणे अपेक्षित आहे.   -----------------------

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातliquor banदारूबंदी