शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ४९ विद्यार्थिनींचा शिक्षकांकडूनच लैंगिक छळ

By admin | Updated: April 1, 2015 02:02 IST

बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

अकोला : बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले. विद्यालयातील दोन शिक्षकांकडून गत चार वर्षांपासून छळ सुरू असल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.केंद्र शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये हा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिक्षक आर. बी. गजभिये आणि शैलेश रामटेके हे विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करीत होते. या विद्यार्थिनींशी नेहमीच अशा प्रकारची लगट साधण्याचा प्रयत्न दोन्ही शिक्षक करीत होते. विद्यार्थिनींनी याला विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाही, विद्यालयातून काढून टाकले जाईल, अशा धमक्या त्यांनी दिल्या. या दबावामुळे विद्यार्थिनी दोन्ही शिक्षकांचा छळ चार वर्षांपासून निमूटपणे सहन करीत होत्या; मात्र एका विद्यार्थिनीने धाडस करून या प्रकाराची तक्रार २० मार्च रोजी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सिंह यांच्याकडे केली. सिंह यांनी चौकशी करून या प्रकरणाचा अहवाल प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे पाठविला. विद्यार्थिनीने तक्रार केल्याची माहिती मिळताच दोन्ही शिक्षकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन २५ मार्च रोजी तिच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. त्यानुसार विद्यार्थिनीने तक्रार मागे घेतली. दरम्यान, या प्रकरणाची एक तक्रार राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांच्याकडेही करण्यात आली होती. त्यानुसार मिरगे यांनी ३१ मार्च रोजी मुलींची चौक शी केली असता, नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींनी या दोन शिक्षकांविरुद्ध लेखी तक्रार दिली. त्यानंतर पालक-विद्यार्थ्यांची सभा घेण्यात आली आणि या प्रकरणाची तक्रार डॉ. आशा मिरगे यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिली. (प्रतिनिधी)