अकलूदला जुगाराचा डाव उधळला, 24 आरोपींसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: January 8, 2017 12:59 IST2017-01-08T12:59:43+5:302017-01-08T12:59:43+5:30

फैजपूर तालुक्यातील अकलूद शिवारातील हॉटेल किनाराजवळील पत्री शेडमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोसिलांच्या संयुक्त कारवाईत

Akalud's money was seized, 24 accused and 7 lakhs worth of money were seized | अकलूदला जुगाराचा डाव उधळला, 24 आरोपींसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकलूदला जुगाराचा डाव उधळला, 24 आरोपींसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 8 - फैजपूर तालुक्यातील अकलूद शिवारातील हॉटेल किनाराजवळील पत्री शेडमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोसिलांच्या संयुक्त कारवाईत २४ जुगारींना गजाआड करण्यात आले,  तर एक लाख ५१ हजार रुपये रोकडसह दहा दुचाकी, १७ मोबाईलसह एकूण सात लाख एक हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात व सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी ही कारवाई केली़ 
घटनास्थळावरून कट्टाही जप्त
पोलिसांच्या कारवाईप्रसंगी निंबाच्या झाडाला आडोशाला शेख इकबाल शेख इब्राहीम हा इसम संशयास्पद स्थिती उभा असल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व तीन काडतूस जप्त करण्यात आले़ त्याची किंमत ४५ हजार रुपये इतकी आहे.
अवैध धंदे चालकांनी बसवले बस्तान
भुसावळच्या अवैध धंदेचालकांनी अकलूद येथे बस्तान बसवले आहे़ या परीसरात मोठ्या प्रमाणावर जुगारासह सट्टा, मटका सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे़ पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Akalud's money was seized, 24 accused and 7 lakhs worth of money were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.