अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 00:06 IST2025-03-14T00:04:30+5:302025-03-14T00:06:01+5:30
Jay Pawar Rutuja photos: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात लवकरच मंगलकार्य पार पडणार आहे. सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करत जय पवार यांचे लग्न ठरल्याची बातमी दिलीये.

अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद
Jay Pawar Engage with Rutuja: पवार कुटुंब एका मंगल कार्याच्या निमित्ताने एकत्र येताना दिसणार आहे. हो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान सुपूत्र जय पवार हे लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. जय पवार यांनी आजोब शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जय पवारांचे लग्न निश्चित झाल्याची बातमी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजकारणापासून दूर असलेले जय पवार लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा प्रचार करताना दिसले होते. राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या जय पवार यांच्यामुळे आता पवार कुटुंब एकत्र येताना दिसणार आहे.
जय पवार ऋतुजा यांच्यासोबत करणार विवाह
खासदार आणि जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी जय पवार यांनी केलेल्या एका पोस्टमुळे या लग्नाची गोड बातमी समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि ऋतुजा यांचे फोटो शेअर केले आहेत.
जय पवार यांनी होणारी पत्नी ऋतुजा यांच्यासोबत आजोबा-आजी म्हणजेच शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीचे फोटो पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी जय पवार यांचे अभिनंदन केले आहे. जय पवार यांचा लवकरच साखरपुडा होणार असल्याचे समजते.
जय पवार यांचा सुरूवातीच्या काळात राजकारणात फार रस नव्हता. त्यांचे मोठे बंधू पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी उद्योग व्यवसायाकडेच लक्ष दिले. काही वर्षे त्यांनी परदेशात व्यवसाय केला.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते बारामतीत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते राजकारणात जास्त सक्रिय झाल्याचे दिसले. बारामती मतदारसंघात ते फिरताना दिसतात.