Ajit Pawar: अजित पवार यांच्या फुटीची पुन्हा चर्चा, राष्ट्रवादी शिबिराच्या पत्रिकेत नावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:18 IST2023-04-21T06:17:17+5:302023-04-21T06:18:00+5:30

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी मुंबईत होत असून या शिबिराला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar's split is discussed again, there is no name in the leaflets of the nationalist camp | Ajit Pawar: अजित पवार यांच्या फुटीची पुन्हा चर्चा, राष्ट्रवादी शिबिराच्या पत्रिकेत नावच नाही

Ajit Pawar: अजित पवार यांच्या फुटीची पुन्हा चर्चा, राष्ट्रवादी शिबिराच्या पत्रिकेत नावच नाही

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी मुंबईत होत असून या शिबिराला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. मात्र, कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात कुठेही अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी ते उद्या दिवसभर पुण्यात असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे कार्यकर्ता शिबिर  पूर्वीच ठरले होते. मात्र, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ते रद्द करण्यात आले होते. तेव्हाही अजित पवारांचे नाव  प्रसिद्धीपत्रकात नव्हते आणि ते शिबिराला येणार नव्हतेच, असेही राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. 

Web Title: Ajit Pawar's split is discussed again, there is no name in the leaflets of the nationalist camp