शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार, २२ आमदार शरद पवारांकडे जाणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:48 IST

Rohit Pawar Criticize Ajit Pawar: काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठा महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. यात भाजपाला सर्वात जास्त जागा हव्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटही आपल्या ताब्यात असलेल्या जागा सोडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कोंडी होत आहे.

काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठा महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. यात भाजपाला सर्वात जास्त जागा हव्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटही आपल्या ताब्यात असलेल्या जागा सोडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाची कोंडी होत आहे. महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला एका हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्याच जागा मिळतील, असा दावा केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवार गटाचे २२ आमदार माघारी फिरून पुन्हा शरद पवार गटात येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत मोठा दावा करताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटामधील २२ आमदारांना परत शरद पवार यांच्याकडे यायचं आहे. तसेच अजितदादांसोबत असलेल्या १२ आमदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवणं, फायदेशीर ठरेल असं वाटत आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. शिंदे गटातील अनेक जणांना भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरूनही रोहित पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत ९ जागा लढायला मिळतील, अशी आशा होती. मात्र त्यांना केवळ ४ जागांवरच समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. आता लोकसभा निवडणुकीला अशी स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर कुणीच उभं राहणार नाही. सगळे भाजपाकडून कमळ चिन्हावर लढतील. त्यामुळेच अजित पवार गटात काही जण असे आहेत जे अजित पवार यांना भाजपामध्ये जावं, असा सल्ला देत आहेत, असा दावाही रोहित पवार यांनी केला.   

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४