शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
5
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
6
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
7
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
8
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
9
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
10
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
11
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
12
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
13
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
14
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
15
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
16
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
17
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
18
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
19
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
20
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका

मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; "मी आजवर कधीही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 3:41 PM

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकांतून अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केला आहे.

मुंबई: माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकांत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहे. या आरोपांवर आज अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. तीन-चार दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, पण माझा त्याचाशी काहीही संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

पुण्यातील येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवारांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह  केल्याचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. अजित पवारांचे थेट नाव न घेता, त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ‘दादा’ असा उल्लेख पुस्तकात केला आहे. या आरोपांवर आज अखेर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

काय म्हणाले अजित पवार ?  आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी बोरवणकर यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी 2008 साली शासनाने काढलेला एक जीआर सादर केला. संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काय संबध? त्यावेळी गृह विभागाचे मंत्री आर आर पाटील होते. मी आणि माझे काम, असा माझा स्वभाव आहे. रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलतो. 

अजित पवार पुढे म्हणतात, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिले नाही. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी कधीही केल्या नाहीत. एखाद्याचे काम होत नसेल, तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो, पण चुकीचे काही काम करत नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी केली.

त्या प्रकरणातील एका कंपनीवर ईडीने कारवाई केली, त्यामुळे हा प्रस्ताव सरकारनेच पुढे रद्द केला होता. आजही ही जागा सरकारच्या ताब्यात आहे. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात बरंच काही आहे, पण माझ्यावर फोकस केला जातोय. या प्रकरणानंतर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी माझी चौकशी करा अशी मागणी केली, तो त्यांचा अधिकार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसyerwada jailयेरवडा जेल