मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; "मी आजवर कधीही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 03:41 PM2023-10-17T15:41:40+5:302023-10-17T15:42:15+5:30

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकांतून अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केला आहे.

Ajit Pawar's detailed explanation on ex IPS Mira Borwankar's allegations; "I've never…" | मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; "मी आजवर कधीही..."

मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; "मी आजवर कधीही..."

मुंबई: माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकांत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहे. या आरोपांवर आज अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. तीन-चार दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, पण माझा त्याचाशी काहीही संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

पुण्यातील येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवारांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह  केल्याचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. अजित पवारांचे थेट नाव न घेता, त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ‘दादा’ असा उल्लेख पुस्तकात केला आहे. या आरोपांवर आज अखेर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

काय म्हणाले अजित पवार ?  
आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी बोरवणकर यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी 2008 साली शासनाने काढलेला एक जीआर सादर केला. संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काय संबध? त्यावेळी गृह विभागाचे मंत्री आर आर पाटील होते. मी आणि माझे काम, असा माझा स्वभाव आहे. रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलतो. 

अजित पवार पुढे म्हणतात, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिले नाही. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी कधीही केल्या नाहीत. एखाद्याचे काम होत नसेल, तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो, पण चुकीचे काही काम करत नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी केली.

त्या प्रकरणातील एका कंपनीवर ईडीने कारवाई केली, त्यामुळे हा प्रस्ताव सरकारनेच पुढे रद्द केला होता. आजही ही जागा सरकारच्या ताब्यात आहे. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात बरंच काही आहे, पण माझ्यावर फोकस केला जातोय. या प्रकरणानंतर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी माझी चौकशी करा अशी मागणी केली, तो त्यांचा अधिकार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.  

Web Title: Ajit Pawar's detailed explanation on ex IPS Mira Borwankar's allegations; "I've never…"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.