Ajit Pawar: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अस्थींचे आज(८ फेब्रुवारी २०२६) रोजी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पारंपरिक धार्मिक विधी पाळत संगमात अस्थी विसर्जन केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
VIP घाटावर विधी
पवार कुटुंबीय चार्टर्ड विमानाने बारामतीहून प्रयागराजला पोहोचले. सकाळी सुमारे ११ वाजता कुटुंबीय प्रयागराज विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरून पवार कुटुंबीय मोठ्या ताफ्यासह प्रयागराज संगमाकडे रवाना झाले. संगमाच्या VIP घाटावर अस्थी विसर्जनाचा विधी पार पडला.
अस्थी कलश यात्रेचा समारोप
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कश्मीर ते कन्याकुमारी अशी अस्थी कलश यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा १२ राज्यांमधून मार्गक्रमण करून रविवारी संगमावर पोहोचली. जय पवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप झाला.
विमान अपघातात निधन
अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. या अपघातात त्यांच्यासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला. तर, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Web Summary : Ajit Pawar's ashes were immersed in Prayagraj's Triveni Sangam by his son, Jai Pawar, following traditional rituals. Family, relatives, and party workers were present. A Kashmir to Kanyakumari 'Asthi Kalash Yatra' concluded there. Pawar died in a plane crash on January 28, 2026.
Web Summary : अजित पवार की अस्थियां प्रयागराज के त्रिवेणी संगम में उनके बेटे जय पवार द्वारा पारंपरिक रीति-रिवाजों के अनुसार विसर्जित की गईं। परिवार, रिश्तेदार और पार्टी कार्यकर्ता मौजूद थे। कश्मीर से कन्याकुमारी तक की 'अस्थि कलश यात्रा' का समापन हुआ। 28 जनवरी, 2026 को एक विमान दुर्घटना में पवार का निधन हो गया।