Ajit Pawar: "आता मी अमृता वहिनींनाच सांगणार आहे बघा जरा...", अजित पवार यांचा फडणवीसांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 15:59 IST2022-12-27T15:57:29+5:302022-12-27T15:59:16+5:30
राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरलं.

Ajit Pawar: "आता मी अमृता वहिनींनाच सांगणार आहे बघा जरा...", अजित पवार यांचा फडणवीसांना चिमटा
नागपूर-
राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरलं. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक महत्वाची कामं रखडून पडलेली असल्याचं सरकारला निदर्शनास आणून देताना सध्याच्या मंत्र्यांकडून तातडीनं निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप केला. अजित पवार यांनी यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याच्या मुद्द्यावरही लक्ष वेधलं. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मोदींबाबत आक्षेपार्ह विधान, CM शिंदे तातडीनं उठले अन् झापलं; मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी
"आता सरकार येऊन सहा महिने लोटले तरी अनेक खात्यांना मंत्री यांना मिळेनात. अनेक कामं रखडली आहेत. आता कुणी कितीही गप्पा केल्या तरी भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसच सर्वात ताकदवान नेते आहेत. कोणत्याही मंत्र्याला काही काम सांगितलं की फडणवीसांना विचारुन सांगतो असं उत्तर मिळतं. सध्या सरकारची अशी अवस्था झाली आहे की मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही अशी नामुष्की यांच्यावर ओढावली आहे. सरकारला एक महिला मंत्री नेमता येत नाही हा तर महिलांचा अपमान आहे. मी आता तर अमृता वहिनींनाच फोन करुन सांगणार आहे की यांच्याकडे बघा जरा", असं अजित पवार यांनी म्हटलं आणि सभागृहात हशा पिकला. काहीतरी करा रात्रीच्या रात्री दिल्लीला फोन लावा आणि उध्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असाही चिमटा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला काढला.
...तर त्यांचा मीच करेक्ट कार्यक्रम करेन
अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना यावेळी बारामती विधानसभा मतदार संघात येऊन केल्या जाणाऱ्या विधानांवरुनही लक्ष्य केलं. "बारामतीत येऊन काहीजण करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वल्गना करतात. पण मी एक सांगतो जर मी मनात आणलं तर जे वल्गना करताहेत त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल", असं अजित पवार म्हणाले.
दोष नसताना तुरुंगात टाकता, मोगलाई आहे का?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका झाल्याच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "दोष नसतानाही तपास संस्थांकडून नेत्यांना तुरुंगात टाकलं जातं. काहीच सिद्ध होत नसताना तुरुंगात जाणं किती योग्य आहे? दोष नसताना तुरुंगांत टाकता ही काय मोगलाई आहे का?", असा सवाल करत अजित पवार यांनी उपस्थित केला.