शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांची भेट घेणाऱ्या विनोद तावडेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 20:06 IST

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीवरून खिल्ली उडवली आहे.

मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीवरून खिल्ली उडवली आहे. सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी नव्हे तर, आपलं तिकीट का कापलं असावं, याची विचारणा तावडेंनी राज्यपालांकडे केली असावी, असा टोला अजित पवार यांनी लगावला. एकीकडे महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि वादळ या अस्मानी संकटांमुळे राज्यातील शेतीचे झालेले मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र आघाडीचे नेते राज्यपालांना भेटण्यापूर्वी विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यात सत्तास्थापनेबाबत तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली असावी, अशी चर्चा सुरू होती. त्यावरून विचारणा केली असता अजित पवार यांनी विनोद तावडे यांना टोला लगावला. ''माझ्या माहितीप्रमाणे विनोद तावडे हे सध्याच्या विधानसभेचे सदस्यसुद्धा नाहीत. ते आपल्या नेत्याला मतसुद्धा देऊ शकत नाही. ते इथे येऊन काय चर्चा करणार आहेत. नेते म्हणून चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे आले असते, त्यांनी चर्चा केली असती तर मी समजू शकलो असतो.  राज्यपाल महोदय तुम्ही आधी भाजपामध्ये होता. माझं तिकीट काहो कापलं असेल हे विचारायला कदाचित तावडे आले असतील,''असा चिमटा अजित पवार यांनी काढला.   दरम्यान, राज्यापालांना भेटल्यानंतर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका केली. तसेच सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही, मुख्यमंत्री कोणाचा होणार याचीच काळजी असल्याचं म्हणत त्यांनी सेना-भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला. 

पुढे ते म्हणाले, शेतीच्या प्रश्नाबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. सांगली, कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. ओल्या दुष्काळाची माहिती राज्यपालांना दिली असून, वीजबिल आणि कर्जमाफीची राज्यपालांकडे मागणी केल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. खरिपाचं पिकंही वाया गेलं आहे. तातडीनं हेक्टरी 1 लाखांची मदत द्या. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सरकारचं अपयश असून, आम्हाला राजकारण करायचं नाही. क्यार आणि महा चक्रीवादळामुळे मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारVinod Tawdeविनोद तावडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा